शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद मनसेला खिंडार, चार कार्यकर्त्यांच्या हकालपट्टीनतंर ५३ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2021 18:59 IST

जिल्हाध्यक्षांना पदावरून दूर करणे, चार पदाधिकाऱ्यांचे निलंबन आणि आता ५३ पदाधिकाऱ्यांचे सामुहिक राजीनामे यामुळे मनसेत खळबळ माजली आहे.

औरंगाबाद : राज ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर औरंगाबाद येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मोठी उलथापालथ झाली आहे. जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांना पदावरून दूर केल्यानंतर इतर चार पदाधिकाऱ्यांची पक्षातून थेट हकालपट्टी करण्यात आली आहे. निलंबित चारही पदाधिकारी दाशरथे यांच्या गटाचे असल्याची माहिती आहे. यानंतर ५३ स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन कुठलीही चुकी नसताना चार पदाधिकाऱ्यांचे निलंबन होणे अत्यंत वेदनादायी असून आम्ही पक्षाचा सामुहिक राजीनामा दिल्याचे जाहीर केले आहे. 

औरंगाबाद मनसेत नवीन जिल्हाध्यक्षांची नियुक्ती होताच मोठी उलथापालथ दिसून येत आहे. गटबाजीवरून पक्षाने सुहास दाशरथे यांची जिल्हाध्यक्ष पदावरून उचलबांगडी केली. त्यानंतर त्यांच्या गटातील संदीप कुलकर्णी, चेतन शर्मा, रमेश पुरी आणि दीपक पवार यांच्यावर पक्षाची बदनामी केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यातून चौघांचेही प्राथमिक सदस्यत्व रद्द केले असल्याचे पत्रक काढण्यात आले आहे. यामुळे स्थानिक स्तरावर तीव्र पडसाद उमटले आहेत. आज दुपारी सदस्यत्व रद्द करण्यात आलेल्या चार पदाधिकाऱ्यांच्या समर्थनार्थ  ५३ पदाधिकाऱ्यांनी सामुहिक राजीनामा दिला. जिल्हाध्यक्षांना पदावरून दूर करणे, चार पदाधिकाऱ्यांचे निलंबन आणि आता ५३ पदाधिकाऱ्यांचे सामुहिक राजीनामे यामुळे मनसेत खळबळ माजली आहे. यावर पक्ष प्रमुख राज ठाकरे काय निर्णय घेतात याकडे आता मनसे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. 

खोटे आरोप करून निलंबित केलेसामुहिक राजीनामा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी संदीप कुलकर्णी, चेतन शर्मा, रमेश पुरी आणि दीपक पवार यांच्यावर झालेली निलंबनाची कारवाई चुकीची असल्याचे म्हटले आहे. मागील अनेक वर्षांपासून आम्ही पक्षाच्या चौकटीत राहून कामे केली, अंगावर केसेस घेतल्या मात्र, आम्हाला हुकुमशाही पद्धतीने पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्या पासून दूर ठेवले. कुठलीही चूक नसताना झालेल्या कारवाईमुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत. हे अत्यंत वेदनादायी असल्याने आम्ही संपूर्ण विचार करून सामुहिक राजीनामा देत असल्याच्या भावना ५३ पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत मांडल्या. 

टॅग्स :MNSमनसेAurangabadऔरंगाबाद