शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Aurangabad Metro: ६,८०० कोटींचा ‘डीपीआर’; शहरातील दोन उड्डाणपूल पाडावे लागणार

By मुजीब देवणीकर | Updated: October 31, 2022 14:35 IST

जालना रोडवर वाढलेली वाहनांची वर्दळ लक्षात घेता चिकलठाणा ते वाळूजपर्यंत एकच अखंड उड्डाणपूल करावा, अशी मागणी मागील काही वर्षांपासून करण्यात येत आहे.

औरंगाबाद: चिकलठाणा ते वाळूजपर्यंत एकच अखंड उड्डाणपूल, त्यावर मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करण्यात आला आहे. यानुसार शहरातील दोन उड्डाणपूल पाडावे लागणार असल्याची माहिती आहे. अखंड उड्डाणपुलासाठी ३ हजार ६०० कोटी, तर मेट्रो सेवेसाठी ३ हजार २०० कोटींचा असा एकत्रित ६ हजार ८०० कोटींचा ‘डीपीआर’ तयार करण्यात आला आहे. स्मार्ट सिटी कार्यालयात आज याचे सादरीकरण करण्यात आले.

जालना रोडवर वाढलेली वाहनांची वर्दळ लक्षात घेता चिकलठाणा ते वाळूजपर्यंत एकच अखंड उड्डाणपूल करावा, अशी मागणी मागील काही वर्षांपासून करण्यात येत आहे. २५ किलोमीटर अंतराच्या उड्डाणपुलासह मेट्रो रेल्वेचा उड्डाणपूल तयार करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला. त्यासाठी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनने प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी महामेट्रोला ‘डीपीआर’ करण्याचे काम सोपविले. महामेट्रोने शहराचा गतिशीलता आराखडा तयार केला आहे. त्यासोबतच मेट्रोचा ‘डीपीआर’देखील तयार करण्यात आला. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, मनपा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्यासमोर स्मार्ट सिटी कार्यालयात आज सादरीकरण करण्यात आले. यानुसार शहरातील मोंढानाका, सेव्हनहिल उड्डाणपूल मेट्रोमुळे पाडावे लागणार आहेत. क्रांती चौक आणि सिडको येथील उड्डाणपूल कामात येतील अशी माहिती आहे. 

तीन वर्ष लागतील कामाला चिकलठाणा ते वाळूजपर्यंत अखंड उड्डाणपूल तयार केला जाणार आहे. हा पूल दुमजली (डबलडेकर) असेल. त्यावरून वाहतूक आणि मेट्रोदेखील धावणार आहे. या कामाची परवानगी २०२३ मध्ये मिळाली तर पुढील तीन वर्षात काम पूर्ण होईल. नोव्हेंबर अखेरपर्यंत ‘डीपीआर’ सादर केला जाणार आहे. ‘डीपीआर’ तयार करताना शहर विकास आराखड्यात मेट्रोसाठी लागणारी जमीन संपादित करावी लागेल. त्यासोबतच संरक्षण विभागाकडून छावणीमधून मेट्रोचा पूल उभारण्याकरिता ना हरकत परवानगी घ्यावी लागेल. त्यामुळे मेट्रोचा ‘डीपीआर’ तयार झाल्यानंतरही या अडचणी प्रामुख्याने सोडवाव्या लागणार आहेत.

अखंड उड्डाणपूलअखंड उड्डाणपूल उभारण्यासाठी महामेट्रोने ३ हजार ६०० कोटी रुपयांचा ‘डीपीआर’ तयार केला आहे. त्यासोबतच मेट्रो रेल्वेसाठी ३ हजार २०० कोटी रुपयांचा उड्डाणपूल बांधण्यासाठीचा ‘डीपीआर’ बनविण्यात आला आहे. दोन्ही उड्डाणपूल मिळून ६ हजार ८०० कोटी रुपयांचा ‘डीपीआर’ तयार केला आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाBhagwat Karadडॉ. भागवत