शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद मास्कची चढ्या दरानेच विक्री; सर्जिकल मास्क, एन-९५ मास्कसाठी नागरिकांच्या खिशाला कात्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 19:14 IST

स्वस्तात मास्क मिळणे कागदावरच असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या रिअ‍ॅलिटी चेकमध्ये आढळून आले.

ठळक मुद्देशासनाच्या नव्या आदेशानुसार सर्जिकल मास्क ३ ते ४ रुपयांत कुठेच उपलब्ध नाही. अनेक औषधी दुकानांत मास्कची विक्रीच बंद करण्यात आली आहे.

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : राज्यात आता एन-९५ मास्क १९ ते ४९ रुपयांपर्यंत, तर दुपदरी आणि तीनपदरी मास्क ३ ते ४ रुपयांना मिळणार असल्याचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला; परंतु शहरात अद्यापही चढ्या दरानेच मास्कची विक्री सुरू आहे. स्वस्तात मास्क मिळणे कागदावरच असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या रिअ‍ॅलिटी चेकमध्ये आढळून आले.

शासनाच्या नव्या आदेशानुसार सर्जिकल मास्क ३ ते ४ रुपयांत कुठेच उपलब्ध नाही. त्यासाठी सरळ ५ ते १० रुपये आकारले जात आहेत, तर १९ रुपये, २५ रुपये, २८ रुपये, ३७ रुपये या दरातील एन-९५ मास्कही कुठेच मिळाला नाही. शहरातील अनेक औषधी दुकानांत मास्कची विक्रीच बंद करण्यात आली आहे. 

सर्जिकल ५ रुपये, एन-९५ मास्क ५० रुपयेडॉ. हेडगेवार रुग्णालय परिसरातील शिवनेरी स्वस्त औषधी दुकानावर सर्जिकल मास्कसाठी ५ रुपये आकारण्यात आले, तर एन-९५ मास्कसाठी ५० रुपये सांगण्यात आले. मास्कची किंमत कमी झाल्याविषयी विचारणा केली, तेव्हा जुना साठा आहे. त्यामुळे कमी दरात मास्कची विक्री करता येत नसल्याचे औषधी विक्रेत्याने सांगितले.

थेट १० रुपयांना सर्जिकल मास्करेल्वेस्टेशन रोडवरील ओम औषधी दुकानात सर्जिकल मास्कची मागणी करण्यात आली. तेव्हा एका मास्कसाठी थेट १० रुपये सांगण्यात आले. तेव्हा मास्कचे दर कमी झाले, १० रुपये कसे, अशी विचारणा केली. त्यावर स्वस्तातील मास्क आले तर दिले जातील ना, असे औषधी दुकानदाराकडून सांगण्यात आले. 

एन-९५ मास्क ४० रुपये, सर्जिकल ५ रुपयेघाटी, ज्युबिली पार्क परिसरातील स्वस्त औषधी सेवा या औषधी दुकानावर एन-९५ मास्कची मागणी करण्यात आली. खरेदी केलेल्या एका मास्कसाठी ४० रुपये आकारण्यात आले, तर सर्जिकल मास्कसाठी ५ रुपये सांगण्यात आले. मास्कचे दर कमी झाल्याविषयी विचारले असता ते मुंबई, पुण्यात झाल्याचे विक्रेत्याने सांगितले.

...तर कारवाई केली जाणारज्या मास्कच्या  किमती निश्चित केल्या आहेत, त्यानुसार त्यांची विक्री केली पाहिजे. दरापेक्षा अधिक किमतीला कोणी मास्कची विक्री करीत असेल तर कारवाई केली जाईल.- संजय काळे, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य