औरंगाबाद : सोलापूर- धुळे या राष्ट्रीय महामार्गातील औरंगाबाद- कन्नड या रस्त्याच्या कामाला केंद्र सरकारने अधिसूचना काढून मंजुरी दिली आहे. आता भूसंपादनाचा मार्ग मोकळा झाला असून, येत्या तीन महिन्यांत टेंडर प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्गात जिल्ह्यातील चार तालुक्यांतील ४४ गावांमधील ५१३ हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. औरंगाबाद शहराच्या दक्षिण बाजूस बीड बायपासला समांतर औरंगाबाद बायपास तयार करण्यात येणार आहे. येथून २११ क्रमांकावर राष्ट्रीय महामार्ग जाणार आहे. औरंगाबाद ते कन्नडपर्यंतच्या चौपदरी रस्त्यासाठी केंद्र सरकारने अधिसूचना काढली आहे. १२० कि.मी.च्या या रस्त्यामध्ये येणाऱ्या जमिनी संपादित करण्यासाठी त्वरित रक्कम उपलब्ध करून देण्यासही केंद्राने मंजुरी दर्शविली आहे.
औरंगाबाद-कन्नड राष्ट्रीय महामार्गाचे टेंडर तीन महिन्यांत
By admin | Updated: October 30, 2014 00:30 IST