शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

औरंगाबादमध्ये आधार, रेशन कार्डची बनावटगिरी उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 12:05 AM

बनावट रेशन कार्ड, आधार कार्ड आणि मतदार कार्ड तयार करणाऱ्या एका मल्टी सर्व्हिसेस सेंटरवर गुन्हेशाखा पोलिसांनी गुरुवारी रात्री धाड मारून रॅकेटचा पर्दाफाश केला. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली

ठळक मुद्देमल्टी सर्व्हिसेसवर छापा : हडको कॉर्नर येथील एका दुकानात चालू होता गोरखधंदा; गुन्हेशाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : बनावट रेशन कार्ड, आधार कार्ड आणि मतदार कार्ड तयार करणाऱ्या एका मल्टी सर्व्हिसेस सेंटरवर गुन्हेशाखा पोलिसांनी गुरुवारी रात्री धाड मारून रॅकेटचा पर्दाफाश केला. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून बनावट रेशन कार्ड, आधार कार्ड, २९ बनावट जात प्रमाणपत्र आणि मतदार कार्ड तयार करण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले. ही कारवाई हडको कॉर्नर परिसरात झाली.मोहम्मद हबीब मोहम्मद हनीफ (२८,रा.कोतवालपुरा), सय्यद हमीद सय्यद हबीब (४५,रा. मुजफ्फरनगर) आणि पूनमचंद दिगंबरसा गणोरकर (५२, रा. एन-१२, हडको) अशी आरोपींची नावे आहेत. गुन्हेशाखा पोलिसांनी सांगितले की, हडको एन-१३ येथील न्यू आधार मल्टी सर्व्हिसेसमध्ये बनावट रेशन कार्ड, आधार कार्ड आणि मतदार कार्ड तयार करण्यात येत असल्याची माहिती खबºयाने पोलिसांना दिली. माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे आणि कर्मचाºयांनी गुरुवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास तेथे धाड मारली. त्यावेळी तेथे एकाच व्यक्तीचे छायाचित्र असलेली वेगवेगळी नावे आणि क्रमांक असलेली तीन ते चार आधार कार्ड, जिल्हा अन्न-धान्य वितरण अधिकारी यांची बनावट स्वाक्षरी असलेले बनावट रेशन कार्ड मिळाले एवढेच नव्हे आधार कार्ड, मतदार कार्ड आणि रेशन कार्ड तयार करण्यासाठी आरोपींनी तयार केलेले बनावट शिक्के, यासोबत शहरातील विविध शासकीय अधिकाºयांच्या नावाचे शिक्के, लॅपटॉप, संगणक, मोबाईल, असा किमती ऐवज मिळाला. आरोपी सय्यद हमीद यास ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी आरोपी पूनमचंद याच्या घरावर धाड मारली. यावेळी त्याच्या घरातूनही बनावट रेशन कार्ड जप्त केले. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हबीब (रा. कोतवालपुरा) हा असल्याचे समजताच पोलिसांनी त्याच्या घरावर धाड मारली. तेथे पोलिसांना मतदार कार्ड तयार करण्यासाठी लागणारा चंदेरी होलोग्रामचा साठा मिळाला.आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हेशाखेत आणल्यानंतर पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी त्यांची कसून चौकशी केली.यावेळी सुरुवातीला उडवा-उडवीची उत्तरे देणारे आरोपी उपायुक्तांच्या खाक्यासमोर पोपटासारखे बोलू लागले.पोलिसांनी प्रथम मल्टी सर्व्हिसेस सेंटरवर धाड मारून तेथील आक्षेपार्ह ऐवज जप्त केला. ही कारावई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे, सहायक आयुक्त सी.डी.शेवगण, पो.नि. शिवाजी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे, पोहेकॉ सुभाष शेवाळे, रेखा चांदे, पोलीस कर्मचारी सुधाकर राठोड, विजयानंद गवळी, सय्यद अशरफ, लालखा पठाण, योगेश गुप्ता, सिद्धार्थ थोरात, नंदलाल चव्हाण, धर्मराज गायकवाड, नितीन धुळे यांनी केली.शंभरहून अधिक बनावट रेशन कार्ड जप्तआरोपींकडून बीपीएल नागरिकांसाठी शासनाने जारी केलेले पिवळ्या रंगाचे ४४ रेशन कार्ड आणि मध्यमवर्गीयांसाठीचे केशरी रंगाचे ६७ रेशन कार्ड, बनावट जात प्रमाणपत्र मिळाले. यासोबतच आरोपींनी तयार केलेले १९ बनावट आधार कार्ड, कलर प्रिंटर, स्कॅनर, लॅपटॉप, संगणक, शिक्के आणि इतर वस्तू जप्त केल्याची माहिती पो.नि.कांबळे यांनी दिली.