शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
3
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
4
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
5
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
6
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
7
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
8
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
9
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
10
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
11
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
12
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
13
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
14
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
15
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
16
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
17
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
18
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
19
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद आगारात ३९ शिवशाही, मात्र मुंबईसाठी धावतात केवळ दोनच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 18:43 IST

सिडको आणि मध्यवर्ती बसस्थानक मिळून ‘एसटी’च्या ताफ्यात ३९ शिवशाही बस आहेत. त्यातील केवळ दोनच बस मुंबईसाठी धावतात.

ठळक मुद्दे खासगी ट्रॅव्हल्सच्या तब्बल ३० बस दररोज मुंबईला भरून जातात एसटी महामंडळाचे अधिकारी या मार्गावर प्रवासी नसल्याचे तुणतुणे वाजवीत आहेत.

औरंगाबाद : एसटी महामंडळाने खाजगी बससेवेला टक्कर देण्यासाठी मोठा गाजावाजा करून वातानुकूलित शिवशाही बस रस्त्यावर उतरविल्या. सिडको आणि मध्यवर्ती बसस्थानक मिळून ‘एसटी’च्या ताफ्यात ३९ शिवशाही बस आहेत. त्यातील केवळ दोनच बस मुंबईसाठी धावतात. खासगी ट्रॅव्हल्सच्या तब्बल ३० बस दररोज मुंबईला भरून जात असताना एसटी महामंडळाचे अधिकारी या मार्गावर प्रवासी नसल्याचे तुणतुणे वाजवीत आहेत. परिणामी मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करून खाजगी बसचा पर्याय स्वीकारावा लागत आहे.

एसटी महामंडळ काळानुरूप बदल करीत प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन उपाययोजना करीत आहे. औरंगाबादेत गेली अनेक वर्षे केवळ पुण्यासाठी ‘एसटी’ची आरामदायक अशी शिवनेरी बसची सेवा सुरू होती. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर औरंगाबाद विभागाला आॅक्टोबर २०१७ मध्ये दोन शिवशाही बस देण्यात आल्या. यानंतर टप्प्याटप्प्याने शिवशाही बस दाखल होत गेल्या. वातानुकूलित, एअर सस्पेंशन, एलईडी टीव्ही, सीसीटीव्ही कॅमेरे आदी सुविधा आणि किफायतशीर तिकीटदरामुळे शिवशाही बस अल्पावधीतच प्रवाशांच्या पसंतीस उतरली. सिडको आणि मध्यवर्ती बसस्थानक मिळून शिवशाही बसची संख्या आता ३९ वर गेली आहे. 

नोकरी, व्यवसायानिमित्त मुंबईला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. औरंगाबादहून मुंबईला जनशताब्दी, तपोवन, नंदीग्राम, देवगिरी एक्स्प्रेसशिवाय अन्य रेल्वे नाही. दररोज दोन ते तीन हजारांवर प्रवासी ये-जा करतात. अनेकांना वेटिंगवर प्रवास करावा लागतो. त्यामुळे प्रवासी एसटी आणि खाजगी बसला प्राधान्य देतात. ‘एसटी’कडून मुंबईसाठी दोनच शिवशाही बस चालविण्यात येतात. त्यामुळे नाइलाजाने प्रवाशांना खाजगी बसकडे वळावे लागत आहे. एसटी महामंडळाने पुढाकार घेऊन मुंबईसाठी आणखी  बस सुरू करण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे.

बीड, नांदेडला शिवशाहीनाशिक, जळगाव, कोल्हापूर, नागपूर, सावंतवाडी, लातूर, भुसावळ, अकोला, यवतमाळसह बीड, नांदेड मार्गावरही शिवशाही बस चालविण्यात येत आहे. सिडको बसस्थानकातून रात्री ११.३० वाजता मुंबईसाठी शिवशाही बस सुटते. या बसचे ६४९ रुपये प्रवासभाडे आहे. मध्यवर्ती बसस्थानकातून सायंकाळी ५.३० वाजता औरंगाबाद-बोरिवली या मार्गावर शिवशाही बस धावते. या दोन बसचा प्रवाशांना आधार मिळतो. इतर विभागातील काही बस धावतात; परंतु त्या बस आधीच प्रवाशांच्या गर्दीने भरून येतात. 

खाजगी बस ‘सुसाट’च्रेल्वेतील गर्दी आणि ‘एसटी’च्या परिस्थितीने प्रवाशांना मुंबईला जाण्यासाठी खाजगी बसचा आधार घ्यावा लागतो. त्यासाठी ८०० ते १२००  रुपयांपर्यंत तिकीट दर देण्याची नामुष्की प्रवाशांवर ओढावते. एकट्या औरंगाबादेतून मुंबईतून दररोज ३० खाजगी बस धावतात. यातून दररोज किमान ९०० जण प्रवास करतात.  

मागणी यावीमुंबई बससाठी फार मागणी नाही. प्रवाशांची मागणी आली तर लगेच शिवशाही बस सुरू केली जाईल, असे एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक प्रशांत भुसारी म्हणाले.

वेगवेगळे दरशहरातून मुंबईसाठी ३० ट्रॅव्हल्स बस धावतात. वेगवेगळ्या बसचे वेगवगळे दर आहेत. ८०० पासून १२०० रुपयांपर्यंत भाडे आकारले जाते, अशी माहिती औरंगाबाद बस ओनर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशनचे अध्यक्ष राजन हौजवाला यांनी दिली.

प्रवासी म्हणतात...मुंबईला नियमितपणे ये-जा करावी लागते. मुंबई मार्गावर शिवशाही बस वाढवल्या जातील, अशी अपेक्षा होती; परंतु तसे होताना दिसत नाही. जी बस आहे, त्यामध्ये जागा मिळण्याची शाश्वती नसते. त्यामुळे खाजगी बसचा वापर करण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही. मुंबईसाठी शिवशाही बसची संख्या वाढली तर खाजगी बसकडे जाण्याचे टाळता येईल, असे एका प्रवाशाने सांगितले.

टॅग्स :state transportएसटीShivshahiशिवशाहीpassengerप्रवासीAurangabad Central Bus Standऔरंगाबाद मुख्य बसस्थानकAurangabad Cidco Bus Standऔरंगाबाद सिडको बसस्थानक