शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद : हनुमान मंदिर कलश मिरवणुकीवर मुस्लीम बांधवांकडून पुष्पवृष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 11:44 IST

औरंगाबादच्या लाडसावंगी येथील सामाजिक सौहार्दाचे उदाहरण

लाडसावंगी (जि. औरंगाबाद) : राज्यात सुरू असलेल्या भोंगावादाचा ग्रामीण भागात मात्र कुठलाही परिणाम दिसत नाही. औरंगाबाद तालुक्यातील लाडसावंगी येथेही सामाजिक सौहार्द जपण्याची एक घटना गुरुवारी घडली. गावातील हनुमान मंदिराच्या कलशारोहण समारंभासाठी निघालेल्या मिरवणुकीवर गावातील मुस्लीम समाजबांधवांनी पुष्पवृष्टी करून एकतेचा संदेश दिला.

राज्यात मशिदींमध्ये होणाऱ्या अजानविरोधात मशिदींसमोर हनुमान चालीसा लावा, असा आदेश राज ठाकरे यांनी दिला आहे. यामुळे राज्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. मात्र ग्रामीण भागातील वातावरणावर याचा कुठलाही परिणाम झालेला दिसत नाही. लाडसावंगी गावात हनुमान मंदिराचा नुकताच जीर्णोद्धार करण्यात आला. नव्याने बांधलेल्या मंदिरात ५ ते ७ मे दरम्यान धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात गुरुवारी सकाळी गावात रथामधून कलश मिरवणूक काढण्यात आली. 

सकाळी नऊच्या सुमारास  मिरवणूक गावातील मुस्लीम बागवान गल्लीत आली असता, मिरवणुकीवर हाजी अहेमद शेख, फेरोज बागवान, कलीम शेख, डॉ. अकबर शेख, सलीम शेख, आरेफ बागवान, जफर बागवान, अल्ताफ बेग, अफजल शेख, समीर सय्यद, आदींनी पुष्पवृष्टी करून मिरवणुकीचे स्वागत केले. मिरवणूक सुरू असताना मुस्लीम गल्लीत अचानक झालेल्या पुष्पवृष्टीने भाविकही आनंदित झाले. मंदिरात शुक्रवारी कलश स्थापना व शनिवारी नंदी प्राणप्रतिष्ठा करून महाप्रसाद व नंतर रात्री आठ वाजता ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पठाडे यांचे कीर्तन होणार आहे.

एकमेकांच्या सुखदु:खांत होतात सहभागीलाडसावंगी हे गाव औरंगाबाद तालुक्यात मोठे असून हिंदू व मुस्लीम यांची संख्या मोठी आहे; परंतु या गावात आजपर्यंत कधीही धार्मिक तणाव निर्माण झाला नाही. उलट एकमेकांच्या सुखदु:खांत सर्वजण सहभागी होतात. बाहेर कुठेही तणाव निर्माण झाला तरी, गावात याचा कधीही, काहीही परिणाम जाणवत नाही.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद