शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
3
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
4
Gold Silver Price 3 Nov: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
5
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
6
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
7
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
8
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
9
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
10
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
11
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
12
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
13
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
14
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
15
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
16
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
17
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
18
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
19
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...

औरंगाबाद ‘पूर्व’मध्ये सर्वाधिक मुस्लीम उमेदवार, तरी सावे-जलील यांच्यातच खरी लढत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 19:38 IST

एमआयएमसमोर शेवटच्या क्षणापर्यंत व्होटबँक टिकवून ठेवण्याचे आव्हान असेल. कारण १६ उमेदवार मुस्लीम असल्यामुळे मतांचे विभाजन होण्याची दाट शक्यता आहे.

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद पूर्व मतदारसंघात सर्वाधिक २९ उमेदवार असून, त्यात १६ मुस्लीम उमेदवारांचा समावेश आहे. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या या मतदारसंघात उमेदवारांची भाऊगर्दी असली तरी खरी लढत महायुतीतील भाजपचे उमेदवार अतुल सावे आणि एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्यातच होण्याची शक्यता आहे.

काँग्रेसचे लहूजी शेवाळे, वंचित बहुजन आघाडीचे अफसर खान, समाजवादी पार्टीचे डॉ. गफ्फार कादरी आणि बसपाच्या शीतल बनसोडे हेदेखील मैदानात आहेत. भाजप व महायुतीचे उमेदवार गृहनिर्माणमंत्री अतुल सावेऔरंगाबाद पूर्व मतदारसंघातून तिसऱ्यांदा मैदानात आहेत. २०१४, २०१९ ला या मतदारसंघातून विजय मिळविल्यानंतर यावेळी ते हॅटटिक साधतील की नाही, याकडे लक्ष आहे. मतदारसंघात १६ मुस्लीम उमेदवार मैदानात आहेत. त्यामुळे मतविभाजन किती प्रमाणात होते, त्यावर महायुतीची भिस्त आहे, तर महाविकास आघाडीला मुस्लीम, दलितांसह हिंदू मतांचा आधार हवा आहे. एमआयएमसमोर शेवटच्या क्षणापर्यंत व्होटबँक टिकवून ठेवण्याचे आव्हान असेल. कारण १६ उमेदवार मुस्लीम असल्यामुळे मतांचे विभाजन होण्याची दाट शक्यता आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या (४ नोव्हेंबर) दिवशी फक्त १० मुस्लीम उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे एमआयएमला मतदारसंघात परिश्रम करावे लागणार, हे निश्चित आहे. युती, आघाडी आणि एमआयएम असेच चित्र सध्या आहे. 

२०१४ सारखी परिस्थिती...यावेळी मतदारसंघात २०१४ सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. काँग्रेस, एमआयएम आणि भाजप अशा थेट लढतीचे चित्र सध्या आहे. २०१९ ला पूर्व मतदासंघातून सर्वाधिक उमेदवार होते. यावेळीदेखील तशीच परिस्थिती आहे. जिल्ह्यातून सर्वाधिक २९ उमेदवार पूर्व मतदारसंघात आहेत. ३ लाख ५२ हजार ३१३ मतदारांचा हा मतदारसंघ आहे. यात पुरुष मतदार १ लाख ८२ हजार ५२७, तर महिला मतदार १ लाख ६९ हजार ७७२ असून, १४ दिवसांत सर्व उमेदवारांना या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी धावपळ करावी लागेल.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकaurangabad-east-acऔरंगाबाद पूर्वAtul Saveअतुल सावे