शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये ड्रोन, सीसीटीव्ही खरेदी  अडकली ‘टेंडर’ मध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 14:02 IST

शहराच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणारे ड्रोन कॅमेरे आणि सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या खरेदीला लालफितीचा फटका बसला आहे. सीसीटीव्ही खरेदीची निविदा प्रक्रिया महानगरपालिकेचे शहर अभियंता सिकंदर अली करणार असून, त्यांनाच याविषयी विचारा, अशी संतप्त प्रतिक्रिया पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी दिली.

औरंगाबाद : शहराच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणारे ड्रोन कॅमेरे आणि सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या खरेदीला लालफितीचा फटका बसला आहे. सीसीटीव्ही खरेदीची निविदा प्रक्रिया महानगरपालिकेचे शहर अभियंता सिकंदर अली करणार असून, त्यांनाच याविषयी विचारा, अशी संतप्त प्रतिक्रिया पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी सीसीटीव्हीच्या प्रकल्पाविषयी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना दिली.

दोन दिवसांपूर्वी शहरात झालेल्या दंगलीत पोलिसांनी बहुचर्चित ड्रोनचा वापर का केला नाही, असा प्रश्न पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना पत्रकारांनी विचारला असता ते म्हणाले की, माहिती आणि तंत्रज्ञानाचा उपयोग क रून औरंगाबादला देशातील सर्वाधिक सुरक्षित आणि क्राईमलेस शहर म्हणून औरंगाबादची ओळख निर्माण करण्याची आपली संकल्पना आहे. 

ही संकल्पना अस्तित्वात आणण्यासाठी  चिली ड्रोन, कलर ड्रोन, सीसीटीव्ही कॅमेरे महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, हे आपण यापूर्वीही प्रात्यक्षिकांसह सांगितले आहे. केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत औरंगाबाद शहराला १०० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. यात ट्रॅफिक इंटेलिजन्स सिस्टीम अंतर्गत २५ कोटींचा समावेश आहे. या निधीतून पहिल्या टप्प्यांतर्गत १ हजार सीसीटीव्ही आणि चार ड्रोन कॅमेरे खरेदी करण्यात येत आहेत. 

ड्रोन आणि सीसीटीव्ही खरेदी प्रक्रिया आणि त्याची अंमलबजावणी करण्याचे काम महानगरपालिकेस देण्यात आले. ही निविदा प्रक्रिया लवकरात लवकर व्हावी, यासाठी पोलीस आयुक्त मनपाचे शहर अभियंता सिकंदर अली यांच्याकडे पाठपुरावा करीत आहेत. मात्र निविदा प्रक्रिया सुरू होत नसल्याने याविषयी नाराजी व्यक्त करून सिकंदर अली यांना विचारा, असे उत्तर दिले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliceपोलिस