शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्हा युवक व शहर युवक काँग्रेसचे नवे पदाधिकारी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 00:52 IST

जिल्हा युवक काँग्रेस, शहर युवक काँग्रेस व विधानसभा मतदारसंघवार युवक काँग्रेसचे नवे पदाधिकारी जाहीर करण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्हा युवक काँग्रेस, शहर युवक काँग्रेस व विधानसभा मतदारसंघवार युवक काँग्रेसचे नवे पदाधिकारी आज जाहीर करण्यात आले. गेले तीन दिवस यासाठी गांधी भवन, शहागंज येथे अंतर्गत मतदान झाले होते. आज दुपारी गांधी भवनात निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. हरियाणाहून आलेले निरीक्षक जयदीप यादव यांच्या देखरेखीखाली ही निवडणूक संपन्न झाली.औरंगाबाद जिल्हा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी अब्दुल समीर अब्दुल सत्तार हे प्रचंड मतांनी विजयी झाले. त्यांना ३ हजार २९९ मते पडली. ते औरंगाबाद जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव असून, सिल्लोड नगर परिषदेचे अध्यक्ष आहेत. भारत साठे, शेख कैस, सिंधू पवार, विशाल दांडगे हे सत्तार यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार होते. आता ते उपाध्यक्ष झाले. जिल्हा युवक काँग्रेसच्या महासचिवपदी विश्वास औताडे हे निवडून आले. माजी आमदार केशवराव औताडे यांचे नातू व काँग्रेस सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे यांचे चिरंजीव आहेत. त्यांना ८०० मते मिळाली. तर युवराज करकोटक यांना ५८३ मते मिळाली. फुलंब्री विधानसभा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी करमाडचे माजी सरपंच विठ्ठल कोरडे (७०४) मते तर उपाध्यक्षपदी बाबासाहेब म्हस्के (१२२) तर अक्षय घाळ (९७) निवडून आले.औरंगाबाद शहर युवक काँग्रेसऔरंगाबाद शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी मुजफ्फर खान निवडून आले. उपाध्यक्ष म्हणून नीलेश अंबेवाडीकर, उमर पठाण, अश्फाक पठाण हे निवडून आले. तर महासचिव म्हणून इंजिनिअर मोहसीन खान, अब्दुल अजीम, शफिक शेख, नदीम सौदागर, इरफान पठाण, नदीम शेख, सलमान शेख यांची निवड झाली.विधानसभा मतदारसंघनिहायपदाधिकारी असे :औरंगाबाद पूर्व : अध्यक्ष- मोहसीन खान अजीज खान, उपाध्यक्ष- माजीद पठाण, महासचिव- आमेर खान, जावीद खान, मतीन पटेल, औरंगाबाद मध्य : अध्यक्ष - गौरव जैस्वाल, उपाध्यक्ष- इरफान खान, महासचिव- शेख सलीम युसूफ, जावीद देशमुख, औरंगाबाद पश्चिम : अध्यक्ष - मुजाहीद पटेल, उपाध्यक्ष- शोएब शेख, महासचिव- सलमान नवाब पटेल.सत्कार...नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार सुभेदारी गेस्ट हाऊसवर मनपाचे माजी विरोधी पक्षनेते डॉ. जफर खान व प्रदेश युवक काँग्रेसचे माजी सरचिटणीस शेख युसूफ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी हमद चाऊस, इब्राहिम पठाण, नासेर खान, शेख अथर, मतीन अहमद, मोईन इनामदार आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :congressकाँग्रेसElectionनिवडणूक