शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादचे जिल्हाधिकारी चव्हाण यांच्या बदलीला स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 00:37 IST

जिल्हाधिकारीपदी ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांची सोमवारी बदली करण्यात आली होती. बदलीला शासनाने मंगळवारी स्थगिती दिली असून, नवीन जिल्हाधिकारी कोण? याबाबत सध्या तरी कुणाचेही नाव पुढे आलेले नाही.

ठळक मुद्देमहसूल प्रशासन : प्रभारी जिल्हाधिकारीपदी पी. एल. सोरमारे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्हाधिकारीपदी ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांची सोमवारी बदली करण्यात आली होती. बदलीला शासनाने मंगळवारी स्थगिती दिली असून, नवीन जिल्हाधिकारी कोण? याबाबत सध्या तरी कुणाचेही नाव पुढे आलेले नाही. जिल्हा प्रशासनाचा प्रभारी कारभार अतिरिक्त जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे यांच्याकडे देण्यात आला आहे. कर्नाटक निवडणुकीमुळे चव्हाण यांच्या बदलीला स्थगिती दिल्याची चर्चा आहे.ठाणे मनपा आयुक्तांनी कार्यमुक्त करताच पदभार घेणार असल्याचे चव्हाण यांनी सोमवारी लोकमतशी बोलताना सांगितले होते. त्याचवेळी शंकेची पाल चुकचुकली होती. ठाणे मनपा आयुक्तांनी त्यांना कार्यमुक्त केले नाही की त्यांनी बदली रोखण्यासाठी प्रयत्न केले, हे सांगता येत नाही. मंगळवारी दिवसभर त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांनी काही फोन घेतला नाही. दुपारनंतर त्यांच्या बदलीला स्थगिती मिळाल्याचे आदेश येऊन धडकले.मागील तीन-चार वर्षांपासून वर्षभराच्या आतच जिल्हाधिकारी औरंगाबादेतून बदली करून घेत आहेत. येथून बदली करून गेलेले अथवा बदली झालेल्या जिल्हाधिकाऱ्यांना चांगल्या पदावर काम करण्याची संधी मिळते आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी कुणाल कुमार हे पुण्यात बदलून गेले. विक्रमकुमार हे डीएमआयसीचे एमडी म्हणून पदोन्नतीने मुंबईत गेले. त्यानंतर आलेले वीरेंद्रसिंह हे तीन महिन्यांतच मंत्रालयात रुजू झाले. निधी पांडे यांची राजीव गांधी आरोग्य योजनेच्या सीईओपदी वर्णी लागली. त्यानंतर एन.के. राम यांची पुणे जिल्हाधिकारीपदी वर्णी लागली. म्हणजे औरंगाबादेत वर्ष-दीड वर्ष काम करायचे आणि मोठ्या जिल्ह्यांत बदलून जायचे, असा ‘ट्रेंड’ मागील काही वर्षांपासून महसूल प्रशासनात आला आहे. तीन वर्षे एकाच ठिकाणी काम करण्याच्या नियमाचे सर्रासपणे उल्लंघन होतच आहे, शिवाय दुसरीकडे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा व मराठवाड्याची राजधानी असलेला हा जिल्हा दुर्लक्षित होत आहे.स्थगिती आणि प्रभारीपदांचा खेळजानेवारी महिन्यांत विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांची मंत्रालयात बदली झाली होती. त्यालाही शासनाने २४ तासांत स्थगिती दिली. जिल्हाधिकारीपदी चव्हाण यांची बदली केली; परंतु २४ तासांतच त्यांच्याही बदलीला स्थगिती आदेश मिळाला. कचरा प्रकरणातून १६ मार्च रोजी मनपा आयुक्तांची बदली झाली; परंतु पालिका आयुक्तपदी कुणीही दिले नाही. दरम्यान याच काळात पोलीस आयुक्तांना सक्तीच्या रजेवर पाठविले. नवीन पोलीस आयुक्तांची नेमणूक केली नाही. मनपा आणि पोलीस आयुक्त पदांची जबाबदारी प्रभारींवर आहे. त्यातच आता जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी प्रभारींवर येऊन पडली आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीAurangabadऔरंगाबादTransferबदली