शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्ह्यात ५० हजार नागरिक दातांविना; उपचारासाठी खाजगी संस्थांचे पाठबळ मिळण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 13:35 IST

तोंडात काही विकार असेल, तर शरीरप्रकृतीत त्याचे प्रतिबिंब दिसून येते.

ठळक मुद्देदंताविना रुग्णांना आहार घेताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागतेअशा वेळी शरीरावरही परिणाम होत असल्याची चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली.

- संतोष हिरेमठ  

औरंगाबाद : मानवाच्या मुखात दात नसतील, तर काहीही फरक पडत नाही, असा अनेकांचा गैरसमज आहे; परंतु दात नसल्यास अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. वयोमानानुसार दात दुखतात, अनेकदा ते हलून पडून जातात. अशावेळी कृत्रिम दात, कवळी बसविण्याचा सल्ला दिला जातो. औरंगाबाद जिल्ह्यात ५० ते ८० वर्षे वयोगटातील तब्बल ५० हजार नागरिक दातांविना असल्याची माहिती शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.पी. डांगे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

५ फेब्रुवारी हा दिवस मौखिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातर्फे ५ ते १२ फेब्रुवारी दरमऱ्यान मौखिक आरोग्य सप्ताह साजरा के ला जात आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातर्फे जिल्हाभरात शिबिरे घेण्यात येतात. पथनाट्य, कलापथक, कीर्तनाच्या माध्यमातून मौखिक आरोग्याची जनजागृती केली जात आहे. 

डॉ. एस.पी. डांगे म्हणाले की, तोंडात काही विकार असेल, तर शरीरप्रकृतीत त्याचे प्रतिबिंब दिसून येते. त्यामुळे नागरिकांनी मुख आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. गतवर्षी रुग्णसेवेबद्दल राज्य शासनाचा सुश्रुत पुरस्कार मिळाला. रुग्णालयातील डेंटल व्हॅन आणि डॉक्टरांचे पथक संपूर्ण राज्यात विशेषत: ग्रामीण भागांत मौखिक आरोग्यांची सेवा देतात. यामध्ये  दातांना कीड काढणे, चांदी भरणे, कवळी बसविणे आणि इतर उपचार केले जातात. सगळ्या तपासणीच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात जिल्ह्यात ५० हजार रुग्ण कवळीविना, दंतविहीन आढळले आहेत. अशा रुग्णांना आहार घेताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यातून शरीरावरही परिणाम होत असल्याची चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली.

खाजगीत दहा हजारांवर खर्चग्रामीण भागांमध्ये दातांची निगा, स्वच्छता राखण्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे ग्रामीण मौखिक विकाराचे प्रमाण अधिक आढळते. कवळीसाठी खाजगीत दहा हजार रुपयांवर खर्च येतो. ग्रामीण भागातील रुग्णांना ते परवडणारे नसते. त्यामुळे शासकीय दंत महाविद्यालयात उपचारासाठी येणाऱ्यांचा ओघ अधिक आहे. खाजगी रुग्णालयात उपचार करतानाही शासकीय योजनेचा लाभ मिळण्याची गरज असल्याचे दंततज्ज्ञांचे म्हणणे आहे.

उपचारासाठी प्राधान्य जिल्ह्यातील दंत, कवळीविना असलेल्या रुग्णांना प्राधान्याने उपचारासाठी रुग्णालयात बोलाविण्यात आले आहे. रुग्णालयात आतापर्यंत शेकडो रुग्णांवर उपचार करण्यात आलेले आहेत; परंतु अनेक जण अद्यापही प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे ‘पीपीपी’ तत्त्वावर खाजगी संस्थांनी येऊन आर्थिक पाठबळ दिले, तर खाजगी दंत रुग्णालयात जाऊन रुग्णांना सेवा देण्यासाठी प्रयत्न केला जाईल.- डॉ. एस.पी. डांगे, अधिष्ठाता, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय

पहा व्हिडिओ :

टॅग्स :Healthआरोग्यMedicalवैद्यकीयdoctorडॉक्टर