शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्ह्यात दररोज १८२ बालकांचा जन्म, मुलींच्या जन्मदरात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 01:15 IST

औरंगाबाद जिल्ह्यातील लोकसंख्या १९५१ मध्ये ११ लाख ७९ हजार ४०४ इतकी होती. २०११ मध्ये ती ३६ लाख ९५ हजार ९२८ इतकी झाली, तर आता ही लोकसंख्या तब्बल ४० लाखांवर गेली आहे.

संतोष हिरेमठ ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील लोकसंख्या १९५१ मध्ये ११ लाख ७९ हजार ४०४ इतकी होती. २०११ मध्ये ती ३६ लाख ९५ हजार ९२८ इतकी झाली, तर आता ही लोकसंख्या तब्बल ४० लाखांवर गेली आहे. गेल्या ६७ वर्षांत तब्बल साडेतीन पटीने जिल्ह्याची लोकसंख्या वाढली आहे. मागील सहा वर्षांत अतिशय गतीने वाढ झाली असून, ती तब्बल चार लाखांची आहे. जिल्ह्यात दररोज १८२ बालकांचा जन्म होत आहे.११ जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येवर नियंत्रण आणणे, त्यासाठी उपाय सुचवणे हा त्यामागील उद्देश आहे. औरंगाबाद शहराचा मागील काही वर्षांत झपाट्याने विस्तार झाला. चिकलठाणा, रेल्वेस्टेशन आणि वाळूज औद्योगिक वसाहतींमध्ये छोट्या-मोठ्या कंपन्या सुरू झाल्या आणि शहराचा विकास व विस्ताराला गती मिळाली. १९८० ते १९९० च्या कालावधीत रोजगार, उद्योग, व्यवसायासाठी खेड्यापाड्यांतून आलेल्यांनी औरंगाबादेत संसार थाटले. पडेगाव, वाळूज, सातारा, देवळाई, हर्सूल, शेंद्रा अशा चारही दिशांनी शहर वाढले. डोंगरांच्या पायथ्यापर्यंत वसाहती निर्माण झाल्या. परिणामी लोकसंख्याही झपाट्याने वाढत गेली. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरअंतर्गत (डीएमआयसी) स्थापन केलेली आॅरिक अर्थात औरंगाबाद इंडस्ट्रीयल सिटीच्या माध्यमातून आगामी कालावधीत शहराची आणखी वाढ होणार आहे.औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड, सिल्लोड, पैठण, गंगापूर, वैजापूर या तालुक्यांची लोकसंख्या प्रत्येकी ३ लाखांवर गेली आहे. सोयगाव, फुलंब्री, खुलताबाद तालुक्यांनी १ लाखाचा आकडा पार केला आहे. गेल्या सहा वर्षांत वाढलेल्या लोकसंख्येचे हे घड्याळ औरंगाबाद जिल्ह्यात दररोज १८२ वर बालक जन्मास येत असल्याचे दर्शवत आहे. वर्षाकाठी जिल्ह्यात ६६ हजारांवर बालकांचा जन्म होत आहे.लोकसंख्या वाढीबरोबर नवनवीन प्रश्न उभे राहत आहेत. मुलींच्या जन्मदराबाबत मात्र अजूनही समाजात अधिक जनजागृतीची गरज असल्याचे दिसत आहे.

 

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSocialसामाजिक