शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
4
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
5
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
6
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
7
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
8
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
9
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
10
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
11
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
12
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
13
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
14
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
15
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
16
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
17
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
18
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
19
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
20
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश

औरंगाबाद जिल्हा बँक निवडणूक बिनविरोधच व्हायला हवी होती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 16:51 IST

Aurangabad District bank election सुरेशदादा पाटील हयात असते तर ही निवडणूक त्यांनी बिनविरोधच केली असती. एकतर त्यांना 'बॅंक' कळली होती आणि त्यांचा कल नेहमीच 'बिनविरोध' कडे राहत आला होता.

ठळक मुद्दे हरिभाऊ बागडे विरुद्ध डॉ कल्याण काळे व अब्दुल सत्तार विरुद्ध सुभाष झांबड अशी ही निवडणूक आहे.

- स. सो. खंडाळकर

औरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचीनिवडणूक येत्या २१ मे रोजी होत आहे. निवडणूक लोकशाहीचं लक्षण मानलं तरी सहकारी बँकेत ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते, हे बाजूच्या अहमदनगर जिल्ह्यानं दाखवून दिलं आहे.

सुरेशदादा पाटील हयात असते तर ही निवडणूक त्यांनी बिनविरोधच केली असती. एकतर त्यांना 'बॅंक' कळली होती आणि त्यांचा कल नेहमीच 'बिनविरोध' कडे राहत आला होता. आता दोन पॅनेल आमने-सामने उभे आहेत. दोघांनीही पत्रपरिषद घेऊन आपण का लढतो आहोत हे स्पष्ट केले आहे. तरीही सामोपचाराने एकमेकांची 'अडजस्टमेंट'' ओळखून व समजून निवडणूक टाळायचीच असं ठरवलं असतं तर सारं कसं 'आलबेल' होऊन गेलं असतं. सुरेशदादा पाटील यांची उणीव भासत असतानाच आता निवडणुकीची वेळ येऊन ठेपली आहे.

तर हे आश्चर्य ठरेल...प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी ही निवडणूक वाटत नाही. शेवटी ही सत्तेची लढाई आहे. पैसा जसा पैसेवाल्यांकडेच जातो अशी म्हण आहे. तसं सत्ता सत्तावाल्यांकडेच जाते. हरिभाऊ बागडे, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, सतीश चव्हाण, अंबादास दानवे, नितीन पाटील अशा दिग्गज मंडळींना डॉ. कल्याण काळे व सुभाष झांबड यांच्या नेतृत्वाखालील पॅनेल हरवण्याची चमत्कार घडवणार असतील तर ते एक आश्चर्यच ठरावं.

ती चर्चा खोटी ठरली...अब्दुल सत्तार जिल्हा बँक ताब्यात घेऊन पुत्र समीर सत्तार यांना अध्यक्ष बनवतील अशी एक चर्चा सुरू झाली होती, पण ती खोटी ठरली. कारण कोणत्याच मतदारसंघात समीर सत्तार यांचा उमेदवारी अर्ज आला नाही आणि नितीन पाटील हेच अध्यक्षपदाचे उमेदवार राहतील, हे अधिकृतपणे जाहीरही करण्यात आलं आहे. निवडणूक जिंकण्यासाठी लागणारी रणनीती शेतकरी विकास पॅनेलने बनवलेली दिसते. त्यामुळेच त्यांनी विद्यमान उपाध्यक्ष दामूअण्णा नवपुते यांचा बळी देऊन आमदार सतीश चव्हाण व आमदार अंबादास दानवे यांना संधी दिली. खरंतर दानवे हे प्रारंभी काळे-झांबड यांच्याबरोबर होते, पण शेतकरी विकास पॅनलनं त्यांना आपल्याकडं ओढून घेतलं

सहकारात पक्ष नसतो हे खरंच....सहकारात पक्ष नसतो, हे खरंच. तसं नसतं तर काळे-झांबड यांच्या पॅनलमध्ये भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, मनसेचे दिलीप बनकर दिसले नसते. काळे-झांबड यांच्या पॅनलमधील सोसायटी मतदारसंघात खुलताबादहून किरण पाटील डोणगावकर, कन्नडहून अशोक मगर आणि सोयगावहून रंगनाथनाना काळे हे ''टफ फाइट''देतील. मात्र प्रोसेसिंगमधून राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी निवडणूक सोपी समजू नये. हरिभाऊ बागडे विरुद्ध डॉ कल्याण काळे व अब्दुल सत्तार विरुद्ध सुभाष झांबड अशी ही निवडणूक आहे. असं म्हणण्याचं कारण उघड आहे. जाणकाऱ्यांच्या तर ते सहज लक्षात येऊ शकतं...

टॅग्स :AurangabadऔरंगाबादbankबँकElectionनिवडणूक