शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

औरंगाबाद जिल्हा बँकेचे चेअरमन सुरेश पाटील यांची राहत्या घरी आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2019 18:38 IST

औरंगाबाद जिल्हा बँकेचे चेअरमन सुरेश पाटील यांनी आज दुपारी राहत्या घरी आत्महत्या केली. कन्नडचे माजी आमदार नितीन पाटील यांचे ते वडील होते.

औरंगाबाद -   जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे विद्यामान अध्यक्ष तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश दयाराम पाटील (वय 78) यांनी आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास राहत्या घरी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्येपूवी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली आहे. या चिठ्ठीत त्यांनी आत्महत्येसाठी सदाशिव गायके आणि नाना पाटील हे जबाबदार असल्याचे नमूद केल्याचे पोलिसांनी सांगितले.सुरेश पाटील यांनी 2004 पासून त्यांनी बँकेचे अध्यक्षपद भुषवले. विविध पक्षातील विविध जाती-धर्माचे 21 संचालकांना बिनविरोध निवडून आणत ही बँक यशस्वीरित्या सांभाळली.  आज दुपारी घरी असताना दुपारी तीन वाजेच्या सुमारास त्यानी हे टोकाचे पाऊल उचलले. ही बाब कळताच त्यांना तात्काळ समर्थनगरातील साई रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योती मालवली होती. 40 ते 45 वर्षांपासून ते संचालक होते. यापैकी 26 ते 27 वर्षे त्यांनी बँकेचे अध्यक्षपद भुषवले.अध्यक्षपदाच्या काळात त्यांच्यामुळे सर्व पक्षाचे, सर्व जाती धर्माचे संचालक बिनविरोध निवडून आले होते. 110 कोटीची तोट्यात असलेली ही बँक त्यांनी नफ्यात आणली. 11(1) कलम बँकला लागणार होती. बँक डबघाईस येणार होती. अशा बँकेचे त्यांनी पुनर्जीवन केले. कन्नडेच माजी आमदार नितीन पाटील यांचे ते वडील होते. अचानक झालेल्या या घटनेमूळे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर शोककळा पसरली आहे.