शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद शहर ‘सुरत प्लेग’च्या दिशेने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 00:17 IST

पर्यटनाची राजधानी आणि औद्योगिकनगरी औरंगाबाद शहरात मागील एक महिन्यापासून शहरात हजारो मेट्रिक टन कचरा साचला आहे. हा कचरा कुजत असून, त्यातून प्रचंड दुर्गंधी निर्माण झाली आहे. त्यातच शुक्रवारी हलक्या पावसाच्या सरी कोसळू लागल्या आहेत. त्यामुळे शहरात १९९४ मध्ये सुरतमध्ये पसरलेल्या प्लेगसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी शंका शहरातील डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देमोठा धोका : साचलेला कचरा, त्यावर पावसाचा शिडकावा

मुजीब देवणीकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पर्यटनाची राजधानी आणि औद्योगिकनगरी औरंगाबाद शहरात मागील एक महिन्यापासून शहरात हजारो मेट्रिक टन कचरा साचला आहे. हा कचरा कुजत असून, त्यातून प्रचंड दुर्गंधी निर्माण झाली आहे. त्यातच शुक्रवारी हलक्या पावसाच्या सरी कोसळू लागल्या आहेत. त्यामुळे शहरात १९९४ मध्ये सुरतमध्ये पसरलेल्या प्लेगसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी शंका शहरातील डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.शहरात दररोज ४०० ते ४५० मेट्रिक टन कचरा जमा होतो. यातील ३० ते ४० टक्के कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात महापालिकेच्या काही झोन कार्यालयांना यश येत आहे. उर्वरित कचरा शहरातील मुख्य रस्ते, नाले, रिकाम्या प्लॉटवर पडून आहे. दररोज ३०० मेट्रिक टन कचरा गृहीत धरल्यास सध्या शहरात ७ हजारांहून अधिक मेट्रिक टन कचरा साचला आहे. साचलेला कचरा कमी होण्याऐवजी दररोज त्यात वाढच होत आहे. कचºयातून प्रचंड दुर्गंधी येत असल्याने नागरिक परस्पर कचरा जाळून टाकत आहेत.जळालेल्या कचºयावर ठिकठिकाणी अग्निशमन दलाकडून पाणी मारून आग विझविण्यात येत आहे. यावर परत नवीन कचरा येऊन पडत आहे. जुना कचरा, त्यावर पाण्याचा मारा आणि नवीन कचरा या तिहेरी प्रक्रियेने कचरा कुजण्याचे प्रकार सुरू झालेत. ही परिस्थिती अत्यंत विदारक आहे. कचºयात मरण पावलेले उंदीर असल्यास त्यातून पिसा जन्माला येतात. त्या प्लेग जन्माला घालतात. प्लेग हा आजार संसर्गजन्य असून, सुरत शहरात १९९४ मध्ये अशाच पद्धतीने उद्रेक झाला होता. शेकडो नागरिकांना यात जीव गमवावा लागला होता.औरंगाबाद शहरातील कचºयाची गंभीर परिस्थिती पाहून तज्ज्ञ डॉक्टरांना प्लेगसारखी साथ पसरण्याची भीती वाटू लागली आहे. प्लेग हा संसर्गजन्य आजार पसरल्यास तो आटोक्यात आणणे सहजासहजी शक्य होत नाही. १९९४ मध्ये प्लेग अटोक्यात आण्यासाठी खूप औषधी नव्हती. आज औषधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, असेही तज्ज्ञांनी नमूद केले.कचºयाचा फुगा कोणी फुगविला४१६ फेब्रुवारीपासून शहरात कचरा साचला आहे. सुरुवातीचे काही दिवस मनपाने कचरा उचलण्याकडे अजिबात लक्ष दिले नाही. नारेगावच्या आंदोलकांसोबत बोलणी करण्यातच वेळ वाया घालविला. जेव्हा बोलणी अयशस्वी झाली तेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेलेली होती. हजारो मेट्रिक टन कचरा शहरात साचल्यावर मनपा भानावर आली.मृत प्राणी कचºयातशहरात ज्या भागात कचºयाचे डोंगर साचले आहेत, त्या कचºयात मरण पावलेले प्राणी आणून टाकण्यात आले आहेत. यातून रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे.