शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

Imtiaz Jaleel: हिंमत असेल तर नाव बदलून दाखवा!, सरकारी परिपत्रकात औरंगाबादऐवजी संभाजीनगर उल्लेख होताच इम्तिजाय जलील भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2021 17:10 IST

राज्य सरकारच्या एका परिपत्रकात औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आल्यानं एमआयएम (MIM) पक्षाचे नेते आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) चांगलेच संतापले आहेत.

औरंगाबाद-

राज्य सरकारच्या एका परिपत्रकात औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आल्यानं एमआयएम (MIM) पक्षाचे नेते आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) चांगलेच संतापले आहेत. हिंमत असेल तर शहराचं नाव बदलून दाखवावं, असा थेट इशाराच इम्तियाज जलील यांनी राज्य सरकारला दिला आहे. यासोबतच ज्या अधिकाऱ्यांनी परिपत्रकात औरंबादऐवजी संभाजीनगर असा उल्लेख केला त्या अधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचीही मागणी त्यांनी केली आहे. 

औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. शिवसेनेकडून नेहमीच औरंगाबदाचा उल्लेख संभाजीनगर असाच केला जातो. तर काँग्रेसचाही संभाजीनगर नावाला विरोध आहे. शहराचं केवळ नाव बदलून काही शहराचा विकास होत नाही. खरंतर नामांतराऐवजी औरंगाबादमधील पायाभूत सुविधांचा विकास व्हावा, अशी भूमिका काँग्रेसचे नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतली आहे. दरम्यान, राज्य शासनाच्या एका परिपत्रकात औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे. हिंमत असेल तर शहराचं नाव बदलून दाखवा, असं थेट आव्हान जलील यांनी दिलं आहे. 

याआधीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ट्विटर हँडलवरुन एका घोषणेच्या बॅनरमध्ये औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला होता. त्यावेळीही शहराच्या नामांतराचा मुद्दा खूप गाजला होता. औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केल्यानं काँग्रेसमध्येही नाराजी पसरली होती. बाळासाहेब थोरात यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. कोणत्याही शहराचा सामाजिक सलोख टिकून राहावा यासाठी शहराच्या नामांतरणाला आमचा ठाम विरोध आहे, असं बाळासाहेब थोरात यांनी ठणकावून सांगितलं होतं. 

टॅग्स :Imtiaz Jalilइम्तियाज जलीलAurangabadऔरंगाबाद