शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद शहरातील २४ हजार मालमत्तांचा झाला सर्व्हे; राजकीय साथ मिळाल्यास मनपास ३०० कोटी मिळणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 13:55 IST

शहरातील मालमत्ता सर्वेक्षणावर १० ते १२ कोटी रुपये खर्च करण्याऐवजी मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी मनपा आणि आऊटसोर्सिंग कर्मचाऱ्यांकडून दीड महिन्यापूर्वी मालमत्ता सर्वेक्षण सुरू केले.

ठळक मुद्दे५ जून ते ७ जुलैपर्यंत शहरातील तब्बल २४ हजार मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.सर्वेक्षण झालेल्या मालमत्तांना नवीन कर लावण्याचे आव्हान मनपासमोर राहणार आहे.

औरंगाबाद : शहरातील मालमत्ता सर्वेक्षणावर १० ते १२ कोटी रुपये खर्च करण्याऐवजी मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी मनपा आणि आऊटसोर्सिंग कर्मचाऱ्यांकडून दीड महिन्यापूर्वी मालमत्ता सर्वेक्षण सुरू केले. ५ जून ते ७ जुलैपर्यंत शहरातील तब्बल २४ हजार मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. सर्वेक्षण झालेल्या मालमत्तांना नवीन कर लावण्याचे आव्हान मनपासमोर राहणार आहे. राजकीय मंडळींनी या प्रक्रियेला साथ दिल्यास मालमत्ता करातून मनपाला दरवर्षी तब्बल ३०० कोटी रुपये प्राप्त होऊ शकतात.

मागील तीन दशकांत मनपाने मालमत्तांचे सर्वेक्षणच केलेले नाही. नगर परिषदेने, महापालिकेने जुन्या घराला लावलेला कर आजही सुरू आहे. या घराच्या जागेवर आज टोलेजंग इमारत उभी आहे. या नवीन इमारतीला महापालिकेने करच लावलेला नाही. त्यामुळे दरवर्षी प्रशासनाने मालमत्ता कर वसुलीसाठी कितीही प्रयत्न केले तर ८० कोटींपेक्षा एक रुपयाही जास्त वसूल होत नाही. यंदा राजकीय मंडळींनी मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट ३५० कोटी दिले आहे. आतापर्यंत ३० कोटी रुपये वसूल झाले आहेत. मालमत्ता कर महापालिकेचा मोठा आर्थिक कणा आहे. हा कणाच पूर्णपणे मोडकळीस आलेला आहे. त्यामुळे आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी शंभर टक्के  सर्वेक्षणाचा निर्णय घेतला.

३२ दिवसांत २४ हजार ५०२ मालमत्तांचे सर्वेक्षण

५ जूनपासून कंत्राटी आणि मनपाच्या २६९ कर्मचाऱ्यांकडून सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली. यासाठी वार्डनिहाय पथक तयार करण्यात आले आहे. पथक घरोघरी जाऊन मालमत्तांची मोजणी करीत आहे. प्रत्येक पथकाला दररोज २० मालमत्तांची मोजणी करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. मालमत्ताधारकांकडून घेण्यात आलेल्या कागदपत्रांचे त्याच दिवशी स्कॅनिंग केले जात आहे. सुरुवातीला रमजान महिना असल्याने ७ हजार ८१० मालमत्तांची मोजणी झाली. त्यानंतरच्या पंधरा दिवसांत पथकांनी जोमाने काम केल्याचे दिसून येत आहे. ५ जुलैपर्यंत १२ हजार मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतरच्या दोनच दिवसांत साडेचार हजार मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात आले. ३२ दिवसांत २४ हजार ५०२ मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. रोजची आकडेवारी आयुक्तांकडून तपासली जात आहे. आयुक्तांचा या मोहिमेवर वॉच असल्याने पथके जबाबदारीने काम करीत आहेत. 

पुन्हा सर्वेक्षणाची वेळच नकोइमारतीत फेरबदल, पाणीपट्टीसाठी पुन्हा सर्वेक्षणाची वेळ यायला नको म्हणून याच सर्वेक्षणात महापालिका मालमत्ताधारकांकडे कोणकोणत्या सोयी-सुविधा उपलब्ध आहेत, याचीही माहिती घेत आहेत. नळ एक आहे का दोन, बांधकामात बदल झालेला आहे का? अशा मालमत्तांची वेगळी नोंद केली जात आहे. बांधकाम परवानगी, भोगवटा प्रमाणपत्र घेतलेले आहे का? याचीही नोंद सर्वेक्षणाच्या अर्जात घेतली जात आहे. 

सर्वेक्षणाचे प्रभागनिहाय आकडे  प्रभाग-१  : २,५३२  प्रभाग-२  : २,७३०  प्रभाग-३  : १,४३८  प्रभाग-४  : २,७६०  प्रभाग-५  : २,६८६  प्रभाग-६  : ३,२९३  प्रभाग-७  : ३,६०९  प्रभाग-८  : ३,०२३  प्रभाग-९  : २,४३१  एकूण     : २४,५०२

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाTaxकरMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबाद