शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

४० टक्क्यांहून अधिक मते घेणारा ठरेल औरंगाबाद 'मध्य'चा विजेता; उमेदवारांचा कस लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 19:18 IST

२०२४ मध्ये मतदारांची संख्या वाढली. आता ३ लाख ६६ हजार मतदार आहेत. यंदा ६० टक्के मतदान झाले, तर २ लाख १९ हजार होईल.

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात निवडून येण्यासाठी किमान ४० टक्क्यांहून अधिक मतदान उमेदवाराला घ्यावेच लागते. मागील दोन निवडणुकांचा अभ्यास केल्यास झालेल्या मतदानापैकी ४० ते ४२ टक्के मतांची गरज विजयासाठी असते. कोणत्याही एका बाजूला मोठ्या प्रमाणात मतांचे विभाजन झाले, तर ३२ टक्के मते घेऊनही उमेदवार निवडून आल्याचा या मतदारसंघाचा इतिहास आहे.

२०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत मध्य मतदारसंघात २ लाख ८६ हजार मतदान होते. मतदानाच्या दिवशी १ लाख ८८ हजार ४६९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यातील वैध मतांची संख्या १ लाख ८७ हजार ६३६ होती. ६५ टक्के मतदान झाले. या निवडणुकीत तनवाणी यांना २१.८, तर जैस्वाल यांना २२.२ टक्के मतदान मिळाले. या दोघांच्या मतांची एकूण टक्केवारी ४३.८ होते. मत विभाजनाचा फायदा एमआयएमला झाला. इम्तियाज जलील अवघ्या ३२ टक्के मतांवर निवडून आले होते.

२०१९ ची स्थिती२०१९ मध्ये एमआयएम विरुद्ध शिवसेना अशी लढत झाली. यावेळी मतदान ३ लाख १९ हजार ७४४ होते. प्रत्यक्षात १ लाख ९३ हजार १५५ मतदान झाले. टक्केवारी ६०.८ होती. निकालाच्या दिवशी जैस्वाल यांना ४२.६ टक्के, तर एमआयएमचे नासेर सिद्दीकी यांना ३५.४ टक्के मतदान झाले होते.

आताचे चित्र असे :२०२४ मध्ये मतदारांची संख्या वाढली. आता ३ लाख ६६ हजार मतदार आहेत. यंदा ६० टक्के मतदान झाले, तर २ लाख १९ हजार होईल. निवडून येण्यासाठी कोणत्याही उमेदवाराला किमान ४० टक्के म्हणजेच ८७ हजार ८५३ मतदान घ्यावे लागेल. मतदारसंघात लढत शिंदेसेना विरुद्ध एमआयएम अशीच होईल. हिंदू बहुल भागात उद्धवसेनेचे उमेदवार आणि मुस्लिम बहुल भागात वंचितचे उमेदवार किती मतदान घेतील यावर बरेच काही अवलंबून असेल.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकaurangabad-central-acऔरंगाबाद मध्य