शहरं
Join us  
Trending Stories
1
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
2
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
3
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
4
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
5
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
6
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
7
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
8
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
9
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
10
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप
11
'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले
12
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
13
लेक हुशार, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण वडिलांना नव्हतं मान्य! दूधातून गुंगीचं औषध दिलं अन्...
14
चीन-अमेरिका सैन्यात समुद्रात चकमक, ट्रम्पच्या धोकादायक जहाजाला क्षेत्राबाहेर हाकलून लावलं...
15
जुलैमध्ये 'या' कारचं नशीब अचाकनच 'चमकलं'; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; 4 महिन्यांचा विक्रम मोडला!
16
जत्रेतील आकाश पाळण्याला लटकली महिला, पाहणाऱ्यांच्या तोंडचं पळालं पाणी, अखेर...  
17
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
18
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
19
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
20
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?

राष्ट्रीय लोक अदालतमध्ये औरंगाबाद खंडपीठ देशात सर्वप्रथम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2017 19:21 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील उच्च न्यायालय विधि सेवा उपसमितीतर्फे आयोजित राष्ट्रीय लोकअदालतमध्ये १,१५८ प्रकरणे निकाली निघाली. भूसंपादनाची एकूण १,५०० पैकी १,१३५ प्रकरणे आणि मोटार अपघाताची १७७ पैकी २३ प्रकरणे तडजोड करून निकाली काढण्यात आली.

ठळक मुद्देएकाच दिवसात १,१५८ प्रकरणे निकालीयामुळे शासनाच्या सुमारे दहा कोटी रुपयांची बचत झाली आहे. 

औरंगाबाद : मुंबई उच्च न्यायालयाच्याऔरंगाबाद खंडपीठातील उच्च न्यायालय विधि सेवा उपसमितीतर्फे आयोजित राष्ट्रीय लोकअदालतमध्ये १,१५८ प्रकरणे निकाली निघाली. भूसंपादनाची एकूण १,५०० पैकी १,१३५ प्रकरणे आणि मोटार अपघाताची १७७ पैकी २३ प्रकरणे तडजोड करून निकाली काढण्यात आली. यामुळे शासनाच्या सुमारे दहा कोटी रुपयांची बचत झाली आहे. 

वरील निकाली निघालेल्या प्रकरणांची संख्या पाहता संपूर्ण देशातील उच्च न्यायालयांच्या इतिहासात पहिल्यांदाच एका दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रकरणे निकाली काढण्याची ही पहिली वेळ आहे, असे उपसमितीतर्फे कळविण्यात आले आहे.  या वर्षातील राष्ट्रीय लोक अदालतमध्ये एकूण निकाली निघालेल्या प्रकरणांची संख्या जवळपास २,४६५ एवढी आहे. सदरील प्रकरणे निकाली निघाल्यामुळे शासनाचा वेळ, खर्च व मनुष्यबळाची निश्चितच बचत झालेली आहे. तसेच हजाराहून अधिक पक्षकारांना विनाविलंब व त्वरित न्याय व नुकसानभरपाईची रक्कम मिळणार आहे. त्यामुळे पक्षकारांचा प्रकरणे मिटवण्यासाठी ओघ वाढलेला आहे. उच्च न्यायालय विधि सेवा उपसमितीचे चेअरमन न्या. रवींद्र बोर्डे यांच्या आदेशावरून आणि प्रबंधक एच.ए. पाटील आणि आर.आर. काकाणी यांच्या मार्गदर्शनाखाली ९ डिसेंबर रोजी खंडपीठात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन केले होते.

या राष्ट्रीय लोकअदालतीसाठी न्या. व्ही.के. जाधव, न्या. पी.आर. बोरा, न्या. ए.एम. ढवळे, माजी जिल्हा न्यायाधीश ए.टी.ए.के. शेख, अ‍ॅड. के.बी. चौधरी, अ‍ॅड. के.सी. संत, अ‍ॅड. एस.पी. ब्रह्मे, अ‍ॅड. दसगावकर, अ‍ॅड. परांजपे आदींनी महत्त्वाची भूमिका बजावली. लोक अदालतीच्या यशस्वीतेसाठी सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे, सहायक सरकारील वकील अभिजित फुले, भूषण विर्धे, श्रीरंग दंडे, रवींद्र देशमुख, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, उपायुक्त महेंद्र हरपाळकर, शिवानंद टाकसाळे, पी.एल. सोरमारे, न्यायमूर्तींचे खाजगी सचिव अनिल भुन्ने, राजशिष्टाचार अधिकारी अरुण बक्षी, प्रभारी आस्थापना अधिकारी प्रमोद फटके आदींनी परिश्रम  घेतले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCourtन्यायालय