शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

स्ट्रेचर अभावी बाळाचा मृत्यू प्रकरणात आरोग्यमंत्र्यांसह इतर प्रतिवाद्यांना औरंगाबाद खंडपीठाची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 19:19 IST

या प्रकरणी जनहित याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल झाली आहे. 

औरंगाबाद : बंद लिफ्ट तसेच स्ट्रेचर उपलब्ध नसल्यामुळे घाटी रुग्णालयात गरोदर महिला  पायरीवरच प्रसूती होऊन जमिनीवर आदळल्याने नवजात बाळाचा मृत्यू झाल्याच्या घटनेची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करून दोषी अधिकारी आणि डॉक्टरांवर कार्यवाही करण्याची विनंती करणारी जनहित याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल झाली आहे. 

या याचिकेच्या अनुषंगाने न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. आर.जी. अवचट यांनी या घटनेची गंभीर दखल घेत राज्याचे मुख्य सचिव, आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री, आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे सचिव, वैद्यकीय सेवा संचालक आणि औरंगाबादचे उपसंचालक तसेच औरंगाबादचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या (घाटी) अधिष्ठाता यांना नोटिसा बजावण्याचा आदेश दिला. या सर्वांनी एक आठवड्यात त्यांचे म्हणणे सादर करावयाचे आहे. याचिकेची पुढील सुनावणी ५ फेब्रुवारीला होणार आहे. 

किशोर गायकवाड यांनी अ‍ॅड. नितीन व्ही. गवारे यांच्यामार्फत ही जनहित याचिका दाखल केली आहे. त्यांनी याचिकेत म्हटल्यानुसार २२ जानेवारी २०१९ रोजी एक गरोदर महिला घाटी दवाखान्यात प्रसूतीसाठी गेली होती. त्यावेळी लिफ्ट बंद होती व तेथे स्ट्रेचर उपलब्ध नसल्यामुळे ती महिला पायी जिना चढत असताना पायरीवरच प्रसूत झाली. बाळ जमिनीवर पडल्यामुळे दगावले. या पार्श्वभूमीवर लोकमतसह अन्य दैनिकांतील बातम्यांची कात्रणे याचिकेसोबत जोडण्यात आली.

राज्यातील सर्व दवाखाने व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सर्व वैद्यकीय सुविधा व औषधे  पुरविण्यासंदर्भात शासनाने कृती कार्यक्रम तयार करून खंडपीठात सादर करावा. रुग्णालयांच्या वैद्यकीय सेवांचा दर्जा सुधारावा यासाठी ‘पब्लिक हेल्थ अ‍ॅक्रेडेशन बोर्ड’  स्थापन करावे, जेणेकरून वंचितांना याचा फायदा होईल.     

याचिकेच्या प्राथमिक सुनावणीदरम्यान अ‍ॅड. नितीन गवारे यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले की, जसा प्रत्येक नागरिकाला जगण्याचा मूलभूत अधिकार आहे. तसाच राज्यघटनेच्या परिच्छेद २१ नुसार प्रत्येक नागरिकाला वैद्यकीय सेवा मिळणे हासुद्धा त्याचा मूलभूत हक्क आहे. 

टॅग्स :Aurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीDeathमृत्यू