शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

औरंगाबादेत गडचिरोली, कर्नाटकातून नवीन तांदळाची आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 12:13 IST

बाजारगप्पा :  औरंगाबादेतील धान्य बाजारपेठेत परपेठेतून नवीन तांदळाची आवक सुरू झाली.

- प्रशांत तेलवाडकर (औरंगाबाद)

औरंगाबाद धान्य बाजारपेठेत मागील आठवड्यात गडचिरोली व कर्नाटकहून नवीन तांदळाची आवक सुरू झाली आहे. ग्राहकांना दिलासा म्हणजे गहू, ज्वारी, बाजरी व डाळींचे भाव स्थिर होते. 

औरंगाबादेतील धान्य बाजारपेठेत परपेठेतून नवीन तांदळाची आवक सुरू झाली. यात गडचिरोली येथील एचएमटी, बीपीटी तांदळाचा समावेश आहे. तसेच कर्नाटक राज्यातूनही तांदळाची आवक सुरू झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यातून आलेला एचएमटी तांदूळ ४२०० रुपये तर बीपीटी तांदूळ ३००० रुपये प्रतिक्ंिवटल विक्री होत आहे. मागील वर्षी सुरुवातीला या तांदळाचे हेच भाव होते. कर्नाटकमधून आलेल्या नवीन तांदळाचे भाव ३१०० रुपये प्रतिक्ंिवटल आहेत. व्यापारी नीलेश सोमाणी यांनी सांगितले की, डिसेंबर महिन्यात विविध राज्यांतील नवीन तांदूळ स्थानिक बाजारात दाखल होईल. जानेवारी महिन्यात तांदळाच्या ५० ते ७० प्रकारच्या व्हरायटी दाखल होतील. 

मागील दोन ते तीन वर्षांच्या खंडानंतर चालू महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात उत्तर प्रदेशातील नवीन बाजरी बाजारात दाखल झाली होती. यामुळे बाजरीचे भाव १०० रुपयांनी उतरून २००० ते २२५० रुपये प्रतिक्ंिवटल विक्री झाली. उत्तर प्रदेशातील बाजरीची आवक आणखी वाढल्यास भाव आणखी कमी होतील, अशी  शक्यता होलसेल विक्रेत्यांनी व्यक्त केली. मात्र, मागील आठवड्यात बाजरीचे भाव स्थिर होते. 

दुष्काळामुळे ज्वारीची पेरणी कमी झाल्याने ज्वारीचे भाव २६५० ते ३५०० रुपये प्रतिक्ंिवटलपर्यंत जाऊन पोहोचले. यामुळे व्यापाऱ्यांनी शेजारील कर्नाटक राज्यातून नवीन ज्वारी बाजारात विक्रीला आणली. मागील आठवड्यातही १ हजार क्ंिवटल ज्वारीची आवक झाली. २४०० ते २७०० रुपये प्रतिक्ंिवटलदरम्यान ज्वारीचे भाव स्थिर होते. गव्हाची पेरणी कमी असल्याने मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान या राज्यांतून येणाऱ्या गव्हावरच अवलंबून राहावे लागणार आहे. गव्हाचे भावही मागील आठवड्यात स्थिर होते.

मध्यंतरी डाळींच्या भावात मोठी वाढ झाली. मात्र, उठाव घटल्याने डाळींच्या भाववाढीला लगाम लागला आहे. सलग दुसऱ्या आठवड्यात डाळींचे भाव स्थिर होते. हरभरा डाळ ५९०० ते ६१०० रुपये प्रतिक्ंिवटल, तूर डाळ ६००० ते ६३०० रुपये, उडीद डाळ ४००० ते ५२०० रुपये, मूग डाळ ६८०० ते ७३०० रुपये तर मसूर डाळ ४९०० ते ५२०० रुपये प्रतिक्ंिवटलवर स्थिर होते. औरंगाबाद जाधववाडी येथील अडत बाजारात येणाऱ्या मक्याची आवक संपुष्टात आली आहे.

दुष्काळामुळे पेराच कमी असल्याने ज्वारी, गव्हाच्या पिकावर याचा परिणाम होणार असून फेब्रुवारी महिन्यात ज्वारी, गव्हाची आवक किती होईल, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यामुळे स्थानिक आवकवर अवलंबून असलेल्या अडत  बाजारातील व्यवहार बंद पडायच्या मार्गावर आहे.  यापुढील सर्व मदार परपेठेतील आवकवर अवलंबून राहणार असल्याचे येथील व्यापाऱ्यांली सांगितले.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी