शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत प्रशासन यंदा राबविणार हायटेक निवडणूक प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 17:44 IST

विविध अ‍ॅप्स निवडणूक काळात वापरण्यावर भर देण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. 

औरंगाबाद : जिल्ह्यात लोकसभा निवडणूक तिसऱ्या टप्प्यात होणार आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णत: हायटेक प्रक्रिया राबविण्यासाठी वेगाने तयारी करीत आहे. निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेले विविध अ‍ॅप्स निवडणूक काळात वापरण्यावर भर देण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. 

आयसीटी अ‍ॅप्लिकेशन्स निवडणुकीच्या अनुषंगाने तयार करण्यात आले आहेत. व्होटर हेल्पलाईन, पीडब्ल्यूडी अ‍ॅप, सुविधा, सी-व्हिजिल, समाधान असे सहा अ‍ॅप्स निवडणुकीच्या काळात वापरण्यात येणार आहेत. व्होटर हेल्पलाईन या अ‍ॅपमध्ये मतदाराचे नाव, ओळखपत्र आदी माहिती सहजरीत्या उपलब्ध होणे शक्य होईल. पीडब्ल्यूडी अ‍ॅप दिव्यांग मतदारांसाठी विकसित करण्यात आले आहे. मतदानाच्या दिवशी दिव्यांग मतदारांना या अ‍ॅपद्वारे सुविधा मिळविता येणे शक्य होईल. 

राजकीय पक्षांसाठी सुविधा अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. या अ‍ॅपद्वारे निवडणुकीच्या अनुषंगाने लागणाऱ्या सर्व परवानग्या राजकीय पक्षांना मिळविणे सोपे होणार आहे. आचारसंहितेचा भंग होत असल्यास सामान्य नागरिकांसाठी सिव्हिजिल अ‍ॅप आहे. या अ‍ॅपवरून आचारसंहिता भंग झाल्याबाबतची तक्रार नागरिकांना करता येईल. हे अ‍ॅप थेट निवडणूक आयोगाशी जोडलेले असल्यामुळे तक्रार येताच, कारवाई करण्याच्या दिशेने तयारी सुरू होईल, असा दावा प्रशासन करीत आहे. सुविधा आणि समाधान या दोन्ही अ‍ॅपद्वारे तक्रार निवारणासाठी वापर केला जाईल, तर १९५० हा टोल फ्री क्रमांक मतदारांच्या गाऱ्हाणी ऐकून त्या सोडवणुकीसाठी देण्यात आला आहे. 

तिसऱ्या मजल्यावर एक खिडकी कक्षजिल्हाधिकारी कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर एक खिडकी आणि माध्यम कक्ष स्थापन करण्यात आला आहे. निवडणूक खर्च नियंत्रण कक्षदेखील त्याच मजल्यावर स्थापन करण्यात आला आहे. सोशल मीडिया, मुद्रित व दृक्श्राव्य माध्यमांवरील जाहिरातींवर खर्च नियंत्रण कक्ष लक्ष ठेवून राहणार आहे. एक खिडकीतून विविध परवानग्या मिळणे सोपे होईल, असा दावा प्रशासनाने केला आहे. २८ मार्च रोजी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अधिसूचना जारी होणार असल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा वेगाने कामाला लागली आहे. 

टॅग्स :digitalडिजिटलonlineऑनलाइनLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९