शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद @४३ अंश; तापमानाचा ४० वर्षांनंतर जूनमध्ये विक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 20:21 IST

१९७९ मधील तापमानाची बरोबरी

ठळक मुद्देआगामी आठवडाभर तापमान ४० ते ४२ अंशांदरम्यान उन्हाच्या तडाख्यामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर दुपारी शुकशुकाट

औरंगाबाद :  शहराच्या तापमानात अवघ्या एका दिवसात २.३ अंशांनी वाढ होऊन रविवारी कमाल तापमानाने ४३ अंश सेल्सिअस असा जून महिन्यातील उच्चांक गाठला. शहरात १० जून १९७९ इतकेच तापमान नोंदविले गेले होते. तब्बल ४० वर्षांनंतर याच विक्रमी तापमानाची पुन्हा एकदा बरोबरी झाली. काही दिवसांपासून आग ओकणाऱ्या सूर्यामुळे औरंगाबाद शहर ‘सूर्यबाद’ बनत असल्याची चर्चा नागरिकांत सुरूआहे.

चिकलठाणा वेधशाळेत रविवारी (दि. २) कमाल तापमान ४३.० आणि किमान तापमान २५.० अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. शहरात शनिवारी ४०.७ अंश तापमान नोंदविले गेले होते. एकाच दिवसात तापमानात मोठी वाढ झाली. एप्रिल महिन्यानंतर तापमानाने कमाल ४३.६ अंश सेल्सिअस असा मोसमातील उच्चांक गाठला होता. संपूर्ण मे महिन्यात तापमान ४० ते ४२ अंशांदरम्यान नोंदविले गेले. १ जून रोजी तापमान चाळिशीवर आले. त्यामुळे नागरिकांना आता उकाड्यापासून दिलासा मिळेल,अशी अपेक्षा वर्तविण्यात येत होती. मात्र, अद्यापही सूर्य तळपतच आहे. रविवार खऱ्या अर्थाने ‘सनडे’ ठरला. उन्हाने अंगाची लाहीलाही होत असल्याचा अनुभव औरंगाबादकरांना येत आहे. 

उन्हाच्या तडाख्यामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर दुपारी शुकशुकाट पाहायला मिळाला. सायंकाळनंतरही प्रचंड उकाडा होता. जून महिन्यातील विक्रमी तापमानाने औरंगाबादकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. वाढत्या उन्हापासून, उकाड्यापासून दिलासा मिळविण्यासाठी दुपारी आणि सायंकाळी थंडपेय पिण्यासाठी गर्दी होत असल्याचे पाहायला मिळाले.

तापमान चाळिशी पुढेचआगामी आठवडाभर तापमान ४० ते ४२ अंशांदरम्यान राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे पावसाची प्रतीक्षा करताना नागरिकांना आणखी काही दिवस उकाडा सहन करावा लागणार आहे.

टॅग्स :TemperatureतापमानAurangabadऔरंगाबादHeat Strokeउष्माघात