शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : औरंगाबाद @ १२४८ ; दिवसभरात ३० नव्या बाधीत रुग्णांची वाढ; दोन मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 19:25 IST

पहाडसिंगपुरा या नव्या परिसरात कोरोनाचा शिरकाव झाला आहे.

ठळक मुद्देकोरोनामुक्त झालेल्या वडगाव कोल्हाटीत पुन्हा एक पॉझिटिव्ह

औरंगाबाद : शनिवारी सकाळी २३ , दुपारी २ आणि सायंकाळी ५  कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या १२४८ झाली आहे. यातील ५८१ रुग्ण आतापर्यंत उपचार घेवून घरी परतले. तर ६१९ जणांवर उपचार सुरु असून मृतांचा आकडा ४८ झाला आहे.

पहाडसिंगपुरा या नव्या परिसरात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. बहुतांश वैद्यकीय कर्मचारी, अधिकारी याच परिसरात राहत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. खाजगी रुग्णालयातील एका कर्मचारी बाधित झाला. तर कोरोनामुक्त झालेल्या वडगाव कोल्हाटीत पुन्हा एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे.

शनिवारी दिवसभरात या भागात आढळले रुग्ण सादाफ नगर १, रेहमानिया कॉलनी १, महेमूदपुरा १,  औरंगपुरा १,  एन-८ येथील १, एन-४, गणेश नगर २, ठाकरे नगर ( एन-२ ) २, न्याय नगर ३, बायजीपुरा १, पुंडलिक नगर २, बजरंग चौक ( एन-७ ) ३, एमजीएम परिसर १, एन-५ ( सिडको )१, एन -१२ ( हडको ) १, पहाडसिंगपुरा १, भवानी नगर १, राजाबाजार १, एन ८ ( सुयोग हाऊसिंग सोसायटी ) १, कटकट गेट १, केसापुर १, द्वारकापुरी ( एकनाथनगर ) १, मिसारवाडी १ आणि गंगापूर तालुक्यातील वडगाव कोल्हाटी १ या भागातील ८ महिला आणि २२ पुरूष रुग्णांचा समावेश आहे.

कोरोनामुळे दोन वृद्धांचा मृत्यूकिराडपुरा येथील ७५ वर्षीय तर सिटीचौक येथील ७२ वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत एकूण मृतांची संख्या ४८ झाली आहे. किराडपुरा येथील ७५ वर्षीय वृद्धाला १७ मे रोजी भरती करण्यात आले होते. त्यांना कोरोना असल्याचे निदान १८ मे रोजी झाले. शुक्रवारी सकाळी ११.४० वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. तर सिटीचौक येथील ७२ वर्षीय वृद्धाला १९ मे रोजी भरती करण्यात आले होते. उपचारादरम्यान, शनिवारी सकाळी पाच वाजता त्यांचा मृत्यु झाल्याचे डॉ. अरविंद गायकवाड यांनी सांगितले. 

मृत्यूची माहिती देण्यास उशिर  खाजगी रुग्णालयातील १८ मे रोजी झालेल्या बाधिताचा मृत्यू शुक्रवारी सांगण्यात आला. तर जिल्हा प्रशासनाकडून बाधिताचा मृत्यू झाल्यानंतर २४ तासापेक्षाही अधिक उशिरा माहिती माध्यमांना दिली जात आहे. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद