शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
3
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
4
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
5
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
6
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
7
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
8
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
9
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
10
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
11
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
12
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
13
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
14
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
15
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
16
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
17
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
18
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
19
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
20
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी

'औरंगाबाद पश्चिम'मध्ये दोन्ही सेनेचा सामना; शिंदेसेनेचे संजय शिरसाट आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 11:20 IST

शिवसेनेत अडीच वर्षांपूर्वी पडलेल्या फुटीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ देणाऱ्या आमदार संजय शिरसाट यांना शिंदेसेनेने औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी दिली होती.

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद पश्चिममध्ये खरी लढत या दोन्ही शिवसेनेच्या उमेदवारांमध्येच झाल्याचे दिसून आले. शिंदेसेनेचे संजय शिरसाट आणि ठाकरे सेनेचे राजू शिंदे यांच्यात पहिल्या फेरीपासून चुरस पाहायला मिळाली. आठव्या फेरी अखेर शिरसाट ६ हजार ८६३ मतांनी आघाडीवर आहेत. मात्र, मागील तिन फेऱ्यांपासून संजय शिरसाट यांची लिड कमी होत आहे. आठव्या फेरीत शिरसाट यांची लीड १३६० ने कमी झाली होती. मात्र, नवव्या फेरीत पुन्हा संजय शिरसाट यांची लिड पुन्हा वाढली आहे.

शिवसेनेत अडीच वर्षांपूर्वी पडलेल्या फुटीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ देणाऱ्या आमदार संजय शिरसाट यांना शिंदेसेनेने औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी दिली होती. पक्ष फुटीपासून आमदार संजय शिरसाट कायम उद्धवसेनेवर तोंडसुख घेत आले आहेत. त्यांच्याविरोधात उद्धवसेनेने राजू शिंदे यांना निवडणूक रिंगणात उतरविले होते. यासोबत वंचितचे अंजन साळवे आणि रिपाइं डेमोक्रॅटिक पक्षाचे रमेश गायकवाड यांच्यासह एकूण १८ उमेदवार रिंगणात होते.

औरंगाबाद पश्चिम १०८: एकूण मतदान मोजणी (औरंगाबाद पश्चिम १०८ )

एकूण मतदान मोजणी पहिली फेरी :११७३७दुसरी फेरी:२१२५२तिसरी फेरी: २९०६२चौथी फेरी: ३७३४३पाचवी फेरी : ४५८१६सहावी फेरी : ५५२७४सातवी फेरी : ६४३६०आठवी फेरी: ७२७०२नववी फेरी: ८१०१२

राजू शिंदे :पहिली फेरी : ५६२२दुसरी फेरी :८२३९तिसरी फेरी: १०६२०चौथी फेरी: १३११०पाचवी फेरी: १६२७२सहावी फेरी : २०८२९सातवी फेरी :२४८०७आठवी फेरी: २९४१९नववी फेरी: ३२१३८

संजय शिरसाट :पहिली फेरी ५१०५दुसरी फेरी :१०८०२तिसरी फेरी: १५४४७चौथी फेरी: २०८६३पाचवी फेरी: २५७०८सहावी फेरी : २९१६४सातवी फेरी :३३०३०आठवी फेरी: ३६२८२नववी फेरी: ४१४२४

पहिली फेरी ५१९ ने राजू शिंदे पुढे दुसरी फेरी : २५६३ ने संजय शिरसाट पुढे तिसरी फेरी: ५२४७ ने संजय शिरसाट पुढेचौथी फेरी:७७५३ ने संजय शिरसाट पुढेपाचवी फेरी:  ९४३६ने संजय शिरसाट पुढेसहावी फेरी:८३३५ ने संजय शिरसाट पुढेसातवी फेरी :८२२३ ने संजय शिरसाट पुढेआठवी फेरी:  ६८६३ ने संजय शिरसाट पुढेनववी फेरी: ९२८६ ने संजय शिरसाट 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकaurangabad-west-acऔरंगाबाद पश्चिमSanjay Shirsatसंजय शिरसाट