शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रूद्राक्षकांच्या मण्यांनी केली भद्रा मारुतीच्या मुर्तीची आकर्षक सजावट   

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 16:23 IST

मारूतीच्या मुर्तीचा शृगांर तीन पोते रूद्राक्षाकांच्या मण्यांनी करण्यात आला त्यामुळे मुर्ती आकर्षक दिसत होती.

खुलताबाद (औरंगाबाद ) : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या खुलताबाद येथील भद्रा मारूतीच्या दर्शनासाठी  आज श्रावणाच्या दुस-या शनिवारी भाविकांनी गर्दी केली. मारूतीच्या मुर्तीचा शृगांर तीन पोते रूद्राक्षाकांच्या मण्यांनी करण्यात आला त्यामुळे मुर्ती आकर्षक दिसत होती.

हिंदू धर्मियांच्या पवित्र श्रावण महिना सुरू झाला असून आज दुसरा  श्रावणी शनिवार असल्याने ऱात्रीपासुनच खुलताबाद येथील भद्रा मारूतीच्या दर्शनासाठी औरंगाबाद शहर, जिल्हा, परजिल्हा  परिसरातून अनेक भाविक पायी निघाले होते त्यात औरंगाबाद शहरातून  येणा-या  भाविकांची संख्या लक्षणीय होती. पायी  येणा- या  भाविकांच्या सोयीसाठी औरंगाबाद ते खुलताबाद मार्गावर ठिकठिकाणी सेवाभावी, सामाजिक  संस्थेतर्फे चहापाणी व फराळांची व्यवस्था करण्यात आली होती. 

भद्रा मारूतीच्या दर्शनासाठी रात्रीपासुनच भाविक खुलताबादेत दाखल होत होते.  जय भद्राचा जयघोष करीत  भाविकांंच्या पालखी सवाद्य मिरवणुकीने खुलताबाद शहराच्या चोहोबाजुच्या रस्त्याने येत होत्या.  रात्रीपासुनच दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. पवनपुत्र हनुमान कि जय, बजरंग बली कि जय, भद्रा हनुमान कि जय म्हणत भाविक दर्शन घेत होते. सकाऴनंतर भाविकांच्या गर्दीत वाढ झाली. दिवसभर हनुमानभक्तांची वर्दऴ सुरूच होती. भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप आले आहे.

औरंगाबाद येथील जयसुख पटेल हे श्रावण महिन्यात जररोज भद्रा मारूतीचा आकर्षक शृगांर करतात त्यातच श्रावणामधील दर  शनिवारी वेगवेेगळ्या फऴा-फुलांनी ,मोत्यांनी  शृगांर करतात. आज दुस-या शनिवारी  औरंगाबाद येथील  जयसुख पटेल ,निलेश देशमुख,वल्लभ लढ्ढा,श्रीप्रकाश पुरवार,संजय काळे यांनी तीन पोते रूद्राक्षच्या  मन्यांनी  व  नागवेलीच्या पानांनी आकर्षक  शृगांर केला. शनिवार व रविवार दोन दिवस शासकिय सुटी असल्याने भाविकांची मोठी गर्दी आज वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री.घृष्णेश्वर मंदीर व खुलताबाद येथील भद्रा मारूती मंदीरात होती. 

मंदिर परिसरात पोलीस निरीक्षक हरीश खेडकर  व त्यांचे सहकारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला. भाविकांचे सुरऴीत दर्शन व्हावे म्हणून भद्रा मारूती संस्थानचे अध्यक्ष मिठ्ठू पा. बारगळ, सचिव कचरू पा. बारगळ, विश्वस्थ लक्ष्मण फुलारे, लक्ष्मण वरपे, जनसंपर्क अधिकारी राजेंद्र जोंधळे  व  कर्मचारी  पदाधिकारी व स्वंयसेवक परिश्रम घेत आहेत. 

टॅग्स :Bhadramarutiभद्रामारुतीAurangabadऔरंगाबादspiritualअध्यात्मिक