शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात टिप्या गावठी कट्ट्यासह अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 21:34 IST

हद्दपार केलेला टिप्या ऊर्फ शेख जावेद शेख मकसूद याला गावठी कट्टा आणि दोन काडतुसांसह पोलिसांनी रविवारी पकडले.

औरंगाबाद : पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार व हद्दपार केलेला टिप्या ऊर्फ शेख जावेद शेख मकसूद (२६, रा. विजयनगर चौक) याला गावठी कट्टा आणि दोन काडतुसांसह पुंडलिकनगर पोलिसांनी सिडको एन-३ मधील अजयदीप कॉम्प्लेक्सजवळ रविवारी पकडले.

याविषयी पोलिसांनी सांगितले की, कुख्यात टिप्या ऊर्फ शेख जावेद हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार आहे. त्याच्याविरोधात मुकुंदवाडी आणि पुंडलिकनगर ठाण्यात गंभीर स्वरूपाचे नऊ गुन्हे दाखल आहेत. २०१८ मध्ये टिप्याला एक वर्षासाठी शहरातून हद्दपार करण्यात आले होते. मात्र, त्याचा टिप्यावर कोणताही परिणाम झाला नाही.

दरम्यान, रविवारी सकाळी टिप्या हा गावठी कट्टा आणि काडतुसासह सिडको एन-३ मधील एका शॉपिंग कॉम्प्लेक्सजवळ बसला असल्याची माहिती खबऱ्याने सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांना दिली.

माहिती मिळताच पोलीस उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. सोनवणे, उपनिरीक्षक विकास खटके, कर्मचारी रमेश सांगळे, मच्छिंद्र शेळके, बाळाराम चौरे, प्रवीण मुळे, राजेश यदमळ, रवी जाधव, जालिंदर मांटे, दीपक जाधव, शिवाजी गायकवाड आणि विलास डोईफोडे यांनी सापळा रचून टिप्याला पकडले.

यावेळी अंगझडतीत त्याच्याजवळ गावठी कट्टा आणि दोन काडतुसे मिळाली. टिप्याविरोधात पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी