शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत एटीएमवर गोळ्या झाडून रोकड लुटण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 19:36 IST

बुधवारी रात्री शहरातील सेवन हिल ते गजानन महाराज मंदीर रोडवरील एटीएम मशीन फोडण्यासाठी चोरट्यांनी चक्क पिस्टलातून फायरिंग केल्याचे समोर आले.

ठळक मुद्देसेवन हिल ते गजानन महाराज मंदीर रोडवरील निलेश अ‍ॅटोमोबॉईल या दुकानाशेजारी एस.बी.आय. चे एटीएम सेंटर आहे. या एटीएम सेंटरवर सुरक्षा रक्षक नसतो, ही बाब लक्षात घेऊन बुधवारी रात्री ३.१५ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी हे एटीएम लुटण्याचा प्रयत्न केला.

औरंगाबाद : एटीएम मशीन फोडून त्यातील रोकड लुटण्यासाठी आतापर्यंत अनेक प्रकारचे प्रयत्न चोरट्यांनी केल्याचे ऐकण्यात आलेले आहे. बुधवारी रात्री शहरातील सेवन हिल ते गजानन महाराज मंदीर रोडवरील एटीएम मशीन फोडण्यासाठी चोरट्यांनी चक्क पिस्टलातून फायरिंग केल्याचे समोर आले. एवढे करूनही एटीएम मशीन न फुटल्याने  त्यातील ३ लाख २० हजाराची रोकड सुरक्षित राहिली.

याविषयी पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी की, सेवन हिल ते गजानन महाराज मंदीर रोडवरील निलेश अ‍ॅटोमोबॉईल या दुकानाशेजारी एस.बी.आय. चे एटीएम सेंटर आहे. या एटीएम सेंटरवर सुरक्षा रक्षक नसतो, ही बाब लक्षात घेऊन बुधवारी रात्री ३.१५ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी हे एटीएम लुटण्याचा प्रयत्न केला. एटीएम मशीनचा पत्रा उचकटल्यानंतरही रोकड निघत नसल्याने आरोपींनी मशीनवर चक्क पिस्टलमधून दोन गोळ्या फायर केल्या. या फायरिंग नंतरही मशीनमधील पैशाचा ट्रे त्यांच्या हाती लागला नाही. यामुळे रिकाम्या हाताने चोरटे तेथून पसार झाले. 

आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास बँकेचे अधिकारी कर्मचारी एटीएम मशीनमध्ये नोटा जमा करण्यासाठी गेले असता त्यांना ही  एटीएमचा पत्रा उचकटलेला दिसल्याने त्यांनी तातडीने पोलिसांना या बाबत माहिती दिली. पुंडलिकनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक एल.ए.सिनगारे, गुन्हेशाखेचे निरीक्षक शिवाजी कांबळे,सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पहाणी केली. याप्रकरणी पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

टॅग्स :atmएटीएमtheftचोरीFiringगोळीबारAurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीस