शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

औरंगाबादेत एटीएमवर गोळ्या झाडून रोकड लुटण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 11:17 IST

एटीएम मशीन फोडून त्यातील रोकड लुटण्यासाठी आतापर्यंत अनेक प्रकारच्या युक्त्या-क्लृप्त्या चोरट्यांनी केल्याचे ऐकिवात आहे; पण बुधवारी रात्री शहरातील सेव्हन हिल ते गजानन महाराज मंदिर रोडवरील एटीएम मशीन फोडण्यासाठी चोरट्यांनी चक्क पिस्टलातून फायरिंग केल्याचे समोर आले.

ठळक मुद्देखळबळ : चोरी झालेले पिस्टल वापरल्याचा संशय

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : एटीएम मशीन फोडून त्यातील रोकड लुटण्यासाठी आतापर्यंत अनेक प्रकारच्या युक्त्या-क्लृप्त्या चोरट्यांनी केल्याचे ऐकिवात आहे; पण बुधवारी रात्री शहरातील सेव्हन हिल ते गजानन महाराज मंदिर रोडवरील एटीएम मशीन फोडण्यासाठी चोरट्यांनी चक्क पिस्टलातून फायरिंग केल्याचे समोर आले. एवढे करूनही एटीएम मशीन फोडण्यात त्यांना यश न आल्याने ३ लाख २० हजारांची रोकड सुरक्षित राहिली.

पोलिसांनी सांगितले की, सेवन हिल ते गजानन महाराज मंदिर रोडवरील नीलेश आॅटोमोबॉईल या दुकानाशेजारी एस.बी.आय.चे एटीएम सेंटर आहे. या एटीएम सेंटरवर सुरक्षारक्षक नसतो, ही बाब हेरून गुरुवारी पहाटे ३.१५ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी हे एटीएम लुटण्याचा प्रयत्न केला. एटीएम मशीनचा पत्रा उचकटल्यानंतरही रोकड निघत नसल्याने आरोपींनी मशीनवर पिस्टलमधून दोन गोळ्या फायर केल्या. या फायरिंगनंतरही मशीनमधील पैशांचा ट्रे त्यांच्या हाती लागला नाही. यामुळे रिकाम्या हाताने चोरटे तेथून पसार झाले. गुरुवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास बँकेचे अधिकारी कर्मचारी एटीएम मशीनमध्ये नोटा जमा करण्यासाठी गेले असता त्यांना एटीएमचा पत्रा उचकटलेला दिसल्याने त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. पुंडलिकनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक एल.ए. सिनगारे, गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी कांबळे, सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. याप्रकरणी पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

ते पिस्टल चोरीचे?आरोपींनी एटीएम मशीन फोडण्यासाठी फायरिंग केल्याने मशीनला दोन भोके पडली. शिवाय गोळ्यांच्या दोन रिकाम्या पुंगळ्याही (केस) घटनास्थळी एटीएम सेंटरवर पोलिसांना मिळाल्या. या पुंगळ्या सरकारी गोळ्यासारख्याच आहेत. तीन महिन्यांपूर्वी पोलीस कॉन्स्टेबल अमित स्वामी याचे सर्व्हिस पिस्टल आणि दहा राऊंड आकाशवाणी चौकात झालेल्या अपघातानंतर चोरीला गेले होते. तेच पिस्टल आणि गोळ्या एटीएम फोडण्यासाठी आरोपींनी वापरले आहे का, यादृष्टीने पोलीस तपास करीत आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक कांबळे यांनी दिली.एक सीसीटीव्ही केला बंदआरोपींनी रात्री साडेबारा ते तीन वाजेदरम्यान एटीएम लुटीचा प्रयत्न केला. त्याकरिता आरोपींनी प्रथम एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही कॅमेरा रात्री पाऊण वाजता बंद केला. मात्र, मशीनमध्येही कॅमेरा असतो, त्यामुळे आपण पकडले जाऊ ही बाब लक्षात घेऊन आरोपींनी एटीएम सेंटरमधील सर्व लाईट बंद करून अंधार केला. या मशीनमधील सीसीटीव्ही कॅ मेºयाचे चित्रण शुक्रवारी पोलिसांना मिळणार आहे. हे चित्रण मिळाल्यानंतर चोरट्यांना शोधणे पोलिसांना सोपे होणार आहे.

३ लाख ३८ हजार वाचलेआरोपींनी एटीएम सेंटरमध्ये प्रवेश केल्यानंतर मशीनच्या बाहेरच्या लॉकवर गोळी झाडली. त्यानंतर ते उघडले. मात्र, रोख रक्कम असलेल्या तिजोरीचे लॉक उघडण्यासाठी त्यांनी पुन्हा दुसरी गोळी झाडली. ही गोळी आतमध्येच अडकून राहिल्याने आरोपीच्या प्रयत्नांवर पाणी फेरले. तिजोरी उघडली नसल्याने मशीनमधील रोख ३ लाख ३८ हजार रुपये चोरी होण्यापासून वाचल्याचे पोलिसांनीसांगितले.