शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
2
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
3
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
4
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
5
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
6
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
7
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
8
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
9
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
10
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
11
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
12
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
13
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
14
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
15
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
16
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
17
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
18
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
19
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
20
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
Daily Top 2Weekly Top 5

वाळूमाफियांचा महसूलच्या पथकावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 00:11 IST

शिवना नदीपात्रातील घटना : नायब तहसीलदारांसह तीन कर्मचारी गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरु

वैजापूर : शिवना नदीच्या पात्रात सुरू असलेला बेकायदेशीर वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकावर वाळूमाफियांसह परिसरातील १०० ते १२५ लोकांच्या जमावाने दगडांनी हल्ला चढविला. या घटनेत नायब तहसीलदारांसह तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.रविवारी सायंकाळी लाखनी मांडकी शिवारातील शिवना नदीच्या पात्रात बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती. ही तस्करी थांबविण्यासाठी महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी तातडीने शिवना नदी गाठली. यावेळी चार ते पाच ट्रकमध्ये वाळू भरणा सुरू होता. पण कर्मचाºयांना काही समजण्याच्या आतच तस्करांनी व परिसरातील १०० ते १२५ लोकांच्या जमावाने दगडगोटे मारण्यास सुरुवात केली. यात नायब तहसीलदार भालेराव, तलाठी म्हस्के, लिपिक जाधव व सचिन गायकवाड गंभीर जखमी झाले. त्यांच्या हातावर आणि डोक्यात दगडांचे घाव बसले असून, त्यांच्या नाका-तोंडातून रक्त येत होते. गंभीर अवस्थेत नायब तहसीलदार भालेराव यांना अगोदर लासूर व इतर तीन कर्मचाºयांना देवगाव रंगारी येथे प्राथमिक उपचार करून नंतर वैजापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. रात्री उशिरापर्यंत देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरूहोते.वाळू तस्करांची दादागिरी वाढलीतालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वाळूमाफियांची दादागिरी वाढली आहे. अवैध वाळू उपसा करण्याबरोबरच वाहतूक केली जाते. याला प्रतिबंध करण्यासाठी वैजापूर, शिऊर पोलिसांसह महसूलच्या पथकाकडून वारंवार कारवाया केल्या जातात. रविवारीही लाखनी- मांडकी परिसरातील नदीपात्रातून अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती तहसील पथकाला मिळाली. त्यामुळेपथक शिवना नदीपात्रात गेले आणि हा राडा झाला. पथकाने वाळूमाफियांच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेतली. उपविभागीय अधिकारी संदीपान सानप पोलीस कर्मचाºयांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पथकाला धीर देत कारवाईचे आश्वासन दिले. या घटनेनंतर शिऊर व देवगाव पोलिसांनी तपासास सुरुवात केली आहे.दोषींवर कडक कारवाईहल्लेखोर शंभर ते सव्वाशे जण होते. या सर्वांनी महसूलच्या पथकावर दगडाने हल्ला चढविला. हल्लेखोर कोण आहेत, याची माहिती घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. कोणालाही पाठीशी न घालता दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे तहसीलदार विनोद गुंडमवार यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस