शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पाच आरोपींविरुद्धचा ॲट्रॉसिटीचा गुन्हा उच्च न्यायालयात रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 16:53 IST

गुन्हा, तसेच आरोपीविरुद्ध दाखल केलेले दोषारोप पत्र रद्द करावे, यासाठी आरोपींनी औरंगाबाद खंडपीठात फौजदारी अर्ज दाखल केला होता.

ठळक मुद्देफिर्यादी व आरोपींचे आपसातील वाद दिवाणी स्वरूपाचे असल्याचे मत नोंदवत खंडपीठाने गुन्हा रद्द केला.

औरंगाबाद : बीड जिल्ह्यातील सिरसाळा पोलीस स्टेशनअंतर्गत दाखल ॲट्रॉसिटी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ५ आरोपींवर दाखल गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या.व्ही.के. जाधव आणि न्या.श्रीकांत कुलकर्णी यांनी रद्द केला.

लक्ष्मण गवळी यांनी सिरसाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती की, त्याचे वडील बन्सी गवळी यांनी २० सप्टेंबर, २०१० रोजी खासगी सावकार सय्यद रहीम सय्यद महेबूब याच्याकडून घरखर्च व शेती विकासासाठी ३ लाख रुपये घेतले होते. या व्यवहाराच्या विश्वासापोटी बन्सी गवळी यांनी त्यांच्या नावावरील ३ एकर जमिनीचे खरेदीखत सय्यद रहीम याच्या नावे केले होते. बन्सी गवळी याने सय्यद रहीम यास एकूण रुपये ४ लाख ५० हजार रुपये परत केले होते, परंतु तरीही खरेदीदार सय्यद रहीम हा शेतीची नोंदणी (रजिस्ट्री) बन्सींच्या नावे करीत नव्हता. सय्यद रहीम व त्याच्या इतर ४ साथीदारांच्या त्रासाला कंटाळून फिर्यादीच्या वडिलांनी एक महिन्यापासून अन्न व पाण्याचा त्याग केला होता. ते १६ फेब्रुवारी, २०२० रोजी मरण पावले होते.

या फिर्यादीवरून ५ आरोपींविरुद्ध भा.दं.वि. कलम ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) व ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता.सदर गुन्हा, तसेच आरोपीविरुद्ध दाखल केलेले दोषारोप पत्र रद्द करावे, यासाठी आरोपींनी औरंगाबाद खंडपीठात फौजदारी अर्ज दाखल केला होता. प्रथमदर्शनी आरोपींविरुद्ध कोणताही गुन्हा दिसून येत नाही. आरोपींना विक्री केलेली जमीन परत मिळविण्यासाठी फिर्यादीने सदर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी व आरोपींचे आपसातील वाद दिवाणी स्वरूपाचे असल्याचे मत नोंदवत खंडपीठाने गुन्हा रद्द केला. आरोपीतर्फे ॲड.सुदर्शन जी. साळुंके यांनी बाजू मांडली, तर सरकारतर्फे ॲड.वट्टमवार यांनी काम पाहिले.

टॅग्स :Atrocity Actअॅट्रॉसिटी कायदाBeedबीडAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी