शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

खुल्या प्रवर्गातील ‘शिक्षकोत्सुक’ बेरोजगारांमध्ये संतापाचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 23:03 IST

जिल्हा परिषदेच्या शाळेत नोकरी करण्याचे खुल्या प्रवर्गातील युवकांचे स्वप्न भंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील ३४ पैकी ३३ जि.प.मध्ये खुल्या प्रवर्गासाठी एकही जागा दाखविण्यात आली नाही. खुल्या प्रवर्गातील बेरोजगारांसाठी शिक्षक भरतीच्या जागा वाढविण्यात याव्यात, यासाठी डी.टी.एड., बी.एड. स्टुडंट असोसिएशनतर्फे ७ मार्चपासून पुण्यात शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष संतोष मगर यांनी दिली.

ठळक मुद्दे७ मार्चपासून पुन्हा बेमुदत उपोषण : ३४ पैकी ३३ जिल्ह्यांत खुल्या प्रवर्गाला शून्य जागा

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या शाळेत नोकरी करण्याचे खुल्या प्रवर्गातील युवकांचे स्वप्न भंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील ३४ पैकी ३३ जि.प.मध्ये खुल्या प्रवर्गासाठी एकही जागा दाखविण्यात आली नाही. खुल्या प्रवर्गातील बेरोजगारांसाठी शिक्षक भरतीच्या जागा वाढविण्यात याव्यात, यासाठी डी.टी.एड., बी.एड. स्टुडंट असोसिएशनतर्फे ७ मार्चपासून पुण्यात शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष संतोष मगर यांनी दिली.जि.प.त शेवटची शिक्षक भरती २०१० मध्ये झाली. यानंतर नुकतीच पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. राज्यात जि.प. महापालिका, नगरपालिका आणि खाजगी शिक्षण संस्थांच्या शाळांमध्ये दहा हजार शिक्षकांची पदे भरण्यात येणार असल्याची घोषणा शासनाने केली. जि.प.मध्ये शिक्षक भरतीसाठीची प्रक्रिया सुरू केली असता, खुल्या प्रवर्गातील जागा शून्यावर पोहोचल्यामुळे काही संघटनांनी बिंदू नामावलीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला. या आरोपांची निवेदने शिक्षणमंत्र्यांकडे पाठविण्यात आली. यानुसार शिक्षण विभागाने ज्या जिल्हा परिषदांमध्ये आरक्षित प्रवर्गासाठी पदे उपलब्ध होत आहेत अशा जिल्हा परिषदांमध्ये भरतीसाठी उपलब्ध असलेल्या सर्व पदांवर भरती करण्यात यावी, उर्वरित जिल्हा परिषदांमध्ये सद्य:स्थितीत केवळ अनुशेषाच्या आरक्षित प्रवर्गातील भरतीसाठी उपलब्ध पदांपैकी ५० टक्के पदांवर भरती करण्यात यावी. ज्या जिल्हा परिषदांमध्ये केवळ आरक्षित प्रवर्गातील ५० टक्के पदांवर भरती करण्यात येईल, त्या जि.प.मध्ये बिंदू नामावली पुन्हा तपासून अद्ययावत करण्याबाबत सूचना देण्यात येईल, असे स्पष्ट केले. या निर्णयानंतर प्रत्येक जिल्हा परिषदेमधून शिक्षक भरतीसाठी जाहिरात काढण्यात येत आहे. यात राज्यातील ३४ जिल्हा परिषदांपैकी केवळ एकाच जि.प.मध्ये खुल्या प्रवर्गासाठी १३२ जागा भरण्यात येणार आहेत. उर्वरित ३३ जि.प. मध्ये एकही शिक्षकाचे पद खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार नाही. जागा वाढविण्याच्या मागणीसाठी पुन्हा एकदा बरोजगारांच्या संघटनेतर्फे बेमुदत उपोषण सुरू करण्यात येणार असल्याचे संतोष मगर यांनी स्पष्ट केले.‘एसईबीसी’ प्रवर्गात राज्यात ३६२ जागानव्याने आरक्षण जाहीर झालेल्या मराठा समाजाच्या ‘सामाजिक आणि आर्थिक मागास प्रवर्ग’ला (एसईबीसी) १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार जि.प.च्या जाहिरातींमध्ये या आरक्षणाचा समावेश आहे. मात्र, राज्यातील ३४ जि.प. पैकी २४ मध्ये एसईबीसी प्रवर्गाला शून्य जागा दाखविण्यात आल्या आहेत. उर्वरित १० जि.प.मध्ये ३६२ जागा उपलब्ध असल्याची माहिती संतोष मगर यांनी दिली. यातही बिंदू नामावलींमुळे गोंधळ उडाला असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :jobनोकरीMaratha Reservationमराठा आरक्षण