शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

औरंगाबाद महापालिका आयुक्तपदी अस्तिककुमार पांडे यांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 19:01 IST

दीड महिन्यांपूर्वी महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक हे दीर्घ रजेवर गेले होते.

औरंगाबाद : बीडचे जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडे यांची औरंगाबाद महानगरपालिका आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. यामुळे महानगरपालिकेत तब्बल दीड महिन्यानंतर पूर्णवेळ आयुक्त येणार आहेत. डॉ. निपुण विनायक यांच्या दीर्घ रजेनंतर महापालिका आयुक्तपदाचा अतिरिक्त कारभार जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे होता. 

दीड महिन्यांपूर्वी महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक हे दीर्घ रजेवर गेल्यानंतर त्याच्या बदलीची चर्चा सुरु झाली होती. त्यांच्या अनुपस्थितीमुळे मनपाचे कामकाज खोळंबले होते. यामुळे महापौर, आमदार आणि खासदार यांनी महापालिकेस आयुक्त उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. महापालिका निवडणूक तोंडावर आली आहे. त्यामुळे प्रलंबित विकासकामांच्या संचिका आणि रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी नगरसेवकांचा आटापिटा सुरू आहे. यातच आयुक्त नसल्याने नगरसेवकांची कोंडी झाली आहे. मनपाचा कारभार पूर्णपणे ढेपाळला आहे. नवीन नियमित आयुक्त द्यावा, अशी मागणी सर्व लोक प्रतिनिधींनी राज्यपाल, मुख्य आयुक्त आदींना केली होती.

नवीन नियुक्त मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडे यांच्यासमोर स्मार्ट सिटी, कचरा, कर्मचारी ,कर संकलन आदी समस्यांचा डोंगर उभा आहे. शहरातील काही समस्यांचा संक्षिप्त आढावा

कचऱ्याची निविदा प्रलंबितहर्सूल येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारणीसाठी नवीन निविदा काढण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. विधानसभेच्या आचारसंहितेमुळे ही निविदा काढता आली नाही. आचारसंहिता संपताच आयुक्त दीर्घ रजेवर निघून गेले. तब्बल ३५ कोटी रुपयांची ही निविदा आहे. यामध्ये बांधकाम आणि प्रकल्प उभारणी, असे दोन वेगवेगळे काम एकत्रित करण्यात आले आहेत.

सर्वसाधारण सभा पुढे ढकललीमहापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रचंड तुटवडा आहे. कर्मचारी भरतीसाठी मनपाचा आकृतिबंध मंजूर नाही. यासाठी १३ नोव्हेंबर रोजी महापौरांनी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. आयुक्त नसल्यामुळे सभा आता पुढे ढकलण्यात आली आहे.

वॉर्डांचा प्रारूप आराखडाराज्य निवडणूक आयोगाने प्रभाग निवडणुकीसाठी प्रारूप आराखडा तयार करण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत. आयुक्त नसल्यामुळे अत्यंत संथगतीने प्रारूप आराखड्याचे काम सुरू आहे. यामध्येही सत्ताधारी मनमानी पद्धतीने आराखडा प्रशासनाला तयार करायला लावत आहेत. आयुक्त नसल्यामुळे या विभागात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. २७ नोव्हेंबरपर्यंत प्रारूप आराखडा तयार होण्याची शक्यता कमी आहे.

मनपा कर्मचाऱ्यांना बोनस नाहीदिवाळीपूर्वी मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी सफाई कामगारांना बोनस देण्याचे आश्वासन दिले होते. दिवाळीपूर्वीच आयुक्त दीर्घ सुटीवर निघून गेले. त्यामुळे बोनसची फाईल आयुक्तांच्या टेबलावर धूळ खात पडली आहे. जेव्हापर्यंत आयुक्त येणार नाहीत, तोपर्यंत कर्मचाऱ्यांच्या बोनसचा प्रश्नही सुटणार नाही.

विकासकामांच्या फायली तुंबल्याशहरातील ११५ वॉर्डांमधील विकासकामे अनेक महिन्यांपासून ठप्प आहेत. काही वॉर्डांतील विकासकामांच्या फायली आयुक्तांच्या सहीसाठी पंधरा दिवसांपासून पडून आहेत. अत्यावश्यक व छोट्या-छोट्या कामांच्या फायलींचा अक्षरश: खच पडला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कचरा संकलन करमहापालिका खाजगी कंपनीच्या माध्यमाने सध्या कचरा उचलत आहे. या कामासाठी नागरिकांवर अतिरिक्त कर लावण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत मंजूर झाला आहे. सर्वसामान्य नागरिकांना दररोज एक रुपया द्यावा लागेल. व्यावसायिकांना वेगळे दर द्यावे लागतील. हा कर वसूल करण्यासाठी स्वतंत्र कंत्राटदार नियुक्त करण्यात येणार आहे. तब्बल १० कोटी रुपयांची ही निविदा आहे. आयुक्त नसल्याने निविदा प्रक्रियेला खीळ बसली आहे.

स्मार्ट सिटीतील महत्त्वाची कामेशहराच्या पाणीपुरवठ्यात आमूलाग्र बदल करण्यासाठी तातडीने १० कोटी रुपयांची कामे करण्यास स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे. या कामाची निविदा प्रक्रिया सुरू झालेली नाही. शहरातील ऐतिहासिक दरवाजांची निविदा पुन्हा प्रसिद्ध करणे, शहरात ७५० सीसीटीव्ही बसविणे, वायफाय झोन करणे, स्मार्ट एज्युकेशन, स्मार्ट रुग्णालये अशी महत्त्वाची कामे स्मार्ट सिटीचे सीईओ तथा आयुक्त नसल्याने खोळंबली आहेत.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादBeedबीडAurangabadऔरंगाबाद