शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चिकलठाणा येथे ‘एटीएम’वर खळ्ळखट्याक्; सीसीटीव्ही कॅमेरे उखडून टाकले

By साहेबराव हिवराळे | Updated: April 1, 2023 20:37 IST

मशिनसह काचावर घातले दगड; एटीएमवर हल्ला करणारे नेमके चोर की ग्राहक, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

छत्रपती संभाजीनगर: जालना रोडवरील चिकलठाणा ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या ‘एटीएम’वर खळ्ळखट्याकचा आवाज झाला. दगड घालून व एटीएमचा ‘स्क्रीन बोर्ड’ही फोडण्याचा व कॅश लुटण्याचा प्रयत्न शनिवारी पहाटे घडला. स्थानिक नागरिकांनी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्याला कळविल्याने त्वरित पोलिस घटनास्थळी दाखल झाले, परंतु तोडफोड करणारे येथून फरार झाले होते.

एटीएमवर हल्ला करणारे नेमके चोर की ग्राहक, असा प्रश्न निर्माण झाला आहे. बँक ऑफ इंडियाचे हे एटीएम असून, नुकतेच येथील जुने एटीएम मशिन काढून येथे नवीन आधुनिक पद्धतीचे डिजिटल एटीएम बसविण्यात आले आहे. बँकेचे अधिकारी ठाण्यात बोलविण्यात आले असून, त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अधिक तपास केला जाणार आहे. सीसीटीव्हीचे फुटेज सिडको पोलिस हस्तगत करीत असून, त्यातील रेकार्डिंगवरून एटीएमवर हल्ला करणारे चोर होते की ग्राहक, या दोन्ही दृष्टीने सिडको एमआयडीसी पोलिस तपास करीत, असे पोलिस निरीक्षक गौतम पातारे यांनी सांगितले.

एटीएमसोबत छेडछाडीचा आला फोन...एटीएम हे राजू म्हस्के पाटील यांच्या शाॅपमध्ये असून, त्यांना पहाटे ३.४५ वाजता फोन आला. त्यानंतर, काही वेळात पोलिसांना संपर्क केला. तेथे सिडको एमआयडीसी पोलिस आले. पोलिस आल्यावर साउंडवर एटीएमविषयी माहिती विचारली जात होती. एटीएमला छेडछाड करणाऱ्याविषयी बोलत असल्याने, राउंडवर आलेल्या अधिकाऱ्यांनी संपर्क साधून एटीएम सुरक्षित असल्याचे म्हस्के यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद