शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली जाणार; पालकमंत्री संदीपान भुमरेंची ग्वाही

By विकास राऊत | Updated: April 11, 2023 17:29 IST

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ८ ते २० मार्चदरम्यान अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदतीसाठी शासनाकडे अहवाल पाठविलेला असतानाच ७ एप्रिलपासून आजवर पुन्हा १२५० हेक्टर्सवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ८ ते २० मार्चदरम्यान अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदतीसाठी शासनाकडे अहवाल पाठविलेला असतानाच ७ एप्रिलपासून आजवर पुन्हा १२५० हेक्टर्सवरील पिकांचे नुकसान झाले आहे. कन्नड तालुक्यातील जेऊर, निपाणी, औराळा,  आणि फुलंब्री तालुक्यातील कान्हेगाव व बाबरा या गारपीटीमुळे बाधित झालेल्या पिकांची आज पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीची माहिती घेतली. नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन अहवाल तात्काळ शासनास सादर करावा असे आदेश देत एकही शेतकरी नुकसानीच्या मदतीपासून वंचित राहणार नसल्याची ग्वाही पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी यावेळी दिली.

पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी आज सकाळी जेऊर येथील शेतकरी अशोक पवार, निपाणी येथील दत्तात्रय निकम यांच्या शेतातील कांदा पीक, संजय पवार यांच्या बाजरी पिकाच्या तसेच शिवारातील इतर शेतकऱ्यांच्या शेताला भेट देत नुकसानाची पाहणी करून त्यांना धीर दिला. पीकानुसार झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळेल. ज्वारी, बाजरी, कांदा, आणि इतर फळपिकांचा समावेश मदतीमध्ये होणार आहे. कोणीही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, असा विश्वास पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांनी संवाद साधताना दिला. नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर पालकमंत्र्यांनी निपाणी ते औराळा दरम्यानच्या  रस्त्यांची  देखील पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  विकास मीना, उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते, कृषी उपसंचालक प्रकाश देशमुख, तहसीलदार. वरकड यांच्यासह महसूल आणि कृषी विभागाचे संबंधित अधिकारी या दौऱ्यामध्ये उपस्थित होते.

कन्नड तालुक्यातील निपाणी आणि जेऊर या दोन गावातील शेतीच्या पंचनाम्यासाठी दहा तलाठ्यांची नियुक्ती केली असून लवकरात लवकर शेतीचे पंचनामे पूर्ण होतील, असे यावेळी उपविभागीय  अधिकारी जनार्धन विधाते यांनी सांगितले. त्यानंतर पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी फुलंब्री तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी  आमदार हरिभाऊ बागडे उपस्थित होते. यावेळी उपविभागीय अधिकारी स्वप्निल मोरे आणि तहसीलदार शीतल राजपूत यांनी तालुक्यातील  नुकसान झालेल्या शेतपिकाची  माहिती तसेच करण्यात येत असलेल्या पंचनाम्यांबाबत पालकमंत्री भुमरे यांना माहिती दिली.

उद्या मुख्यमंत्री येण्याची चर्चा विभागात ८ ते २० मार्चदरम्यान झालेल्या गारपीट, अवकाळी पावसामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १३,५३५ हेक्टर्सवरील पिकांचे नुकसान झाले. त्यासाठी २२ कोटी १७ लाख रुपयांच्या मदतनिधीची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. ७ एप्रिलपासून आजवर झालेल्या अवकाळी पावसाने जिरायत ४१ हेक्टर्स, बागायत ११९९ हेक्टर्स, तर १० हेक्टर्सवरील फळबागांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, बुधवारी, दि. १२ एप्रिल रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी येतील, अशी चर्चा आहे. 

टॅग्स :Sandipan Bhumreसंदीपान भुमरेAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरीagricultureशेती