तेहरान : इराणचे न्यूक्लिअर सायंटिस्ट मोहसीन फखरीजादेह यांची तेहरानमध्ये अतिरेक्यांनी गोळ्या घालून हत्या केली. या हत्येमागे इस्रायलचा हात असल्याचा दावा गुप्तचर संस्थेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.
इराणच्या विदेश मंत्रालयाने म्हटले आहे की, या घटनेवरून दिसून येते की, अतिरेकी किती घाबरलेले आणि हताश आहेत. मोहसीन हे अब्सार्ड शहरात असताना अतिरेक्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
......