शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

विभागीय आयुक्तांना ठाणे मनपा आयुक्तपदासाठी विचारणा; महापालिका आयुक्तांनाही हवी बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 15:10 IST

नवीन अधिकारी आल्यास परिस्थिती समजून घेण्यात जाईल आणखी वेळ

ठळक मुद्दे महामारीच्या काळात बदल्यांची चर्चापाण्डेयना धीर धरण्याचा सल्ला

- विकास राऊत 

औरंगाबाद : विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना ठाणे महापालिका आयुक्तपदासाठी विचारणा करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली. याचवेळी महापालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनीही स्वत:हून आपली बदली करावी, अशी विनंती प्रशासनाकडे केल्याची माहिती आहे. 

औरंगाबाद शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही अधिकाऱ्यांच्या बदल्यांची चर्चा आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनीही यासंर्भात एक सर्वपक्षीय बैठक घेऊन त्यांच्या बदलीची चर्चा घडवून आणली होती. मात्र मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर अधिकाऱ्यांच्या बदलीचा मुद्दा मागे पडला. मनपा आयुक्त आस्तिककुमार पांण्डेय यांंना आता शहराचा आवाका आलेला आहे. मनपाच्या प्रशासकीय यंत्रणेवर त्यांची आधीपासूनच पकड आहे. शिवाय कोरोनाच्या परिस्थितीत नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली तर शहर व प्रशासनाचे आकलन होण्यास त्या अधिकाऱ्यास कालावधी लागेल. त्यामुळे सरकारलाही येथे नवा आयुक्त नेमण्याची घाई करता येणार नाही. उलट पाण्डेय हेच परिस्थितीशी मुकाबला करु शकतात, असा उच्चपातळीवर सूर आहे. 

दुसरीकडे केंद्रेकरांना ठाण्याचे आयुक्त म्हणून विचारणा झाली आहे. कोरोनाच्या परिस्थितीत ठाणे महापालिकेत नवीन अधिकाºयाचा शोध सुरू आहे. ठाण्यात नवीन अधिकारी कोण आणावा असा विचार होत असताना शासनाच्या वरिष्ठ पातळीवरून केंद्रेकर यांना ठाणे मनपा आयुक्तपदी विचारणा झाली; परंतु त्यांनी ठाणे येथे बदलीला संमती दिली नसल्याची माहिती आहे.  सध्या ते येथेच थांबणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. विभागीय आयुक्त म्हणून केंद्रेकर यांचा कार्यकाळ सव्वा वर्षे पूर्ण झाला आहे. यापूर्वी २०१८ जानेवारीमध्येच त्यांची बदली औरंगाबाद विभागीय आयुक्तपदावर बदली झाली होती; परंतु माजी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी पूर्ण ताकदीने केंदे्रकर यांची बदली रोखली होती.

मूळचे परभणी जिल्ह्यातील असल्यामुळे मराठवाड्याची जाण असलेले अधिकारी म्हणून केंद्रेकर यांच्याकडे पाहिले जाते. राज्य कृषी आयुक्त, क्रीडा आयुक्त या पदांसह औरंगाबाद मनपा आयुक्त, बीड जिल्हाधिकारी या पदांची धुरा त्यांनी सांभाळली.कोरोनाच्या महामारीत नांदेड येथील संवदेशनील प्रकरण त्यांनी हाताळल्यामुळे मोठा अनर्थ टळला. जिल्हाधिकारी उदय चौधरी ग्रामीण भागात गुंतले आहेत, मनपा आयुक्त क्वारंटाईन आहेत. अशा परिस्थितीत औरंगाबादसह मराठवाड्याची जबाबदारी केंद्रेकर यांच्यावर आहे. 

अपयशाचा ठपका घेऊ नका...औरंगाबादमध्ये रुग्णसंख्या वाढत असताना बदलीची इच्छा व्यक्त करणे म्हणजे अपयशाचा ठपका घेण्याऐवजी येथील परिस्थिती नियंत्रणात आणूनच बदलीचा विचार करा, असा सल्ला पाण्डेय यांना मिळाल्यामुळे त्यांनी बदलीचा मुद्दा बाजूला ठेवल्याचे समजते. पाच दिवसांच्या क्वारंटाईनमधून बाहेर आल्यानंतर ते नव्या जोमाने लागतील, असे दिसते. 

टॅग्स :Divisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालयAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्या