शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात सत्ताबदल अटळ, अशोक चव्हाण यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 04:19 IST

राज्यातील राजकीय खेळपट्टी आमच्यासाठी अनुकूल असून आता कोणते खेळाडू कसे खेळवायचे ते ठरवत आहोत, असे सांगत राज्यात आता सत्ताबदल अटळ आहे, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी बुधवारी ‘लोकमत’च्या संपादकीय सहकाºयांशी चर्चा करताना केला.

- नजीर शेखऔरंगाबाद : राज्यातील राजकीय खेळपट्टी आमच्यासाठी अनुकूल असून आता कोणते खेळाडू कसे खेळवायचे ते ठरवत आहोत, असे सांगत राज्यात आता सत्ताबदल अटळ आहे, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी बुधवारी ‘लोकमत’च्या संपादकीय सहकाºयांशी चर्चा करताना केला.काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरासाठी आलेले चव्हाण यांनी ‘लोकमत भवन’ला भेट दिली. ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर खा. चव्हाण यांनी ‘लोकमत’, ‘लोकमत समाचार’ आणि ‘लोकमत टाइम्स’च्या संपादकीय सहकाºयांशी चर्चा केली.लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित झाल्यास काँग्रेसची काय तयारी आहे, यावर चव्हाण म्हणाले, गुजरात निवडणुकांनंतर अनेक राज्यांत भाजपाविरोधी वातावरण आहे. त्यामुळे किमान मोदींचा चेहरा पुढे करून एकत्रित निवडणुका जिंकता येतील, असे भाजपाला वाटत आहे. त्यामुळेच ही चर्चा होत आहे. तसे झालेच तर आमचीही पूर्ण तयारी आहे.समविचारी पक्षांशी युती करण्यावर चव्हाण म्हणाले की, राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी युतीसाठी हात पुढे केला असून, त्याचे मी स्वागत करतो. धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊ नये, असे आम्हाला वाटते.पंतप्रधान नरेंद्र मोदींना पर्याय नाही असे म्हटले जाते, या प्रश्नावर खा. चव्हाण म्हणाले, राजकारणात सातत्याने पर्याय निर्माण होत असतात. इंदिराजींनंतर राजीव गांधी यांनी देश सांभाळला. त्यानंतर सोनिया गांधी यांनी पक्ष सांभाळला, तर डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधानपद भूषविले. आता राहुल गांधी हे उत्तम पर्याय आहेत.दोघांचे स्कील सारखेचराज्य सरकारला आम्ही ‘फसणवीस सरकार’ अशी उपमा दिली होती. केंद्रात मोदी आणि राज्यात फडणवीस निव्वळ घोषणा देत आहेत. दोघांचे फेकण्याचे ‘स्कील’ सारखेच आहे.शिवसेनेसोबत युती अशक्यशिवसेना किंवा एमआयएम या पक्षांबरोबर युती करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे स्पष्ट करून खा. चव्हाण म्हणाले, हे दोन्ही पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोन्ही जातीयवादी पक्ष आहेत.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस