शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांसोबत राहूनदेखील अजित पवारांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही- राज ठाकरे
2
IPL 2024 GT vs CSK : गुजरातच्या विजयानं RCB चेही स्पर्धेतील आव्हान कायम; CSK चा दारूण पराभव
3
'कोणत्याही व्यासपीठावर नरेंद्र मोदींशी चर्चेस तयार, पण...', राहुल गांधीनी निमंत्रण स्वीकारले
4
सुदर्शननं इतिहास रचला; 'क्रिकेटच्या देवा'ला मागं टाकलं; असं करणारा पहिला भारतीय ठरला
5
IRE vs PAK : आयर्लंडने पाकिस्तानच्या वर्ल्ड कप संघाला लोळवलं; पराभव पाहून बाबर बघतच राहिला
6
GT च्या सलामीवीरांची शतकं! 'करा किंवा मरा'च्या सामन्यात 'सु'दर्शन; CSK समोर तगडे लक्ष्य
7
India vs Pakistan: "पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असेल तर असू द्या, आमच्या भारताकडे PM Modi आहेत"; Tejasvi Surya यांचा Manishankar Iyer यांना टोला
8
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
9
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
10
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
11
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
12
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
13
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
14
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
15
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
16
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
17
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
18
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
19
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
20
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...

नागपुरात फडणवीस- विनोद पाटील भेट; इकडे भुमरेंनी ३ दिवस आधीच उमेदवारी अर्ज भरला

By बापू सोळुंके | Published: April 22, 2024 6:16 PM

मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी महिनाभरापूर्वीच औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. पाटील यांनी महायुतीकडून लढण्याचा विचार बोलून दाखविला होता.

छत्रपती संभाजीनगर: औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिंदेसेनेने जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांना उमेदवारी जाहिर केली. यामुळे शिंदेसेनेकडून इच्छुक असलेले मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांचा पत्ता कट झाला. यानंतरही पाटील यांनी उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवल्याचे दिसून येते. आज सोमवारी दुपारी त्यांनी नागपुर येथे जाऊन भाजपा नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ही बाब कळताच मंत्री भुमरे यांनी अचानक महायुतीच्या स्थानिक नेत्यांना सोबत घेत त्यांचा डमी उमेदवारी अर्ज दाखल केला.  

मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी महिनाभरापूर्वीच औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. पाटील यांनी महायुतीकडून लढण्याचा विचार बोलून दाखविला होता. त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेत उमेदवारीची मागणी केली होती. तेव्हा औरंगाबादची जागा मिळविण्यावरून भाजप आणि शिंदेसेनेमध्ये रस्सीखेच सुरू होती. दरम्यान, औरंगाबादची जागा शिंदेसेनेला मिळाली आणि दोन दिवसापूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांची उमेदवारी पक्षाने घोषित केली. यामुळे विनोद पाटील यांचा पत्ता कट झाला. काही ठिकाणी शिंदेसेनेने उमेदवार बदलले. ही बाब लक्षात घेऊन विनोद पाटील यांनी उमेदवारी मिळविण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरूच ठेवल्याचे दिसून येते. सोमवारी त्यांनी नागपुरात जाऊन भाजप नेते फडणवीस यांची भेट घेतली. ही बाब कळताच महायुतीचे उमेदवार भुमरे यांनी लगेच आ. संजय शिरसाट, भाजप शहराध्यक्ष शिरीष बोराळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटील यांच्या उपस्थितीत दुपारी त्यांचा डमी उमेदवारी अर्ज दाखल केला. 

२५ एप्रिल रोजी दाखल करणार होते उमेदवारी महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून भुमरे हे २५ एप्रिल रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी दाखल करणार होते. तशी माहिती पक्षाचे प्रवक्ता आ. शिरसाट यांनी दिली होती. दरम्यान आज अचानक भुमरे यांनी कोणताही गाजावाजा न करता त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला सुरवात झाली.

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४Chandrakant Khaireचंद्रकांत खैरेSandipan Bhumreसंदीपान भुमरे