शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मनपासाठी महायुतीत लढा, असे बावनकुळे म्हणताच भाजपमधील इच्छुकांचे अवसान गळाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 20:09 IST

शिंदेसेनेचा भाजपवर दबाव : २०१५ च्या फाॅर्म्युल्यानुसार जागा वाटप करा

छत्रपती संभाजीनगर : भाजपचे नेते तथा राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुतीतच महापालिका निवडणुका लढवायच्या आहेत. कुणीही वादंग करण्याची भूमिका घेऊ नका, अशी समज स्थानिक कोअर कमिटीला बुधवारी भाजपच्या चिकलठाणा येथील विभागीय कार्यालयातील आढावा बैठकीत दिल्यानंतर महापालिका निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या अनेकांचे अवसान गळालेच, शिवाय कोअर कमिटीही अस्वस्थ झाली.

२०१५ च्या फाॅर्म्युल्यानुसार जागा वाटप करावे, त्यानंतर उरलेल्या जागा फिप्टी-फिप्टी वाटून घेण्याचा प्रस्ताव शिंदेसेनेने ठेवल्यामुळे भाजपात अस्वस्थता आहे. महायुतीमध्ये मोठा भाऊ कोण ? याचा विचार जागा वाटपाच्या बैठकीत होणार आहे. महायुती करण्याच्या वरिष्ठांच्या सूचनेमुळे भाजपमधील अनेक इच्छुकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

२९ पैकी १८ प्रभागांमध्ये महायुतीसाठी पोषक वातावरण आहे. या प्रभागांमध्ये फिप्टी-फिप्टी जागा वाटप झाले, तर ३६ जागा भाजपच्या व ३६ जागा शिंदेसेनेच्या वाट्याला येतील. या दोन्ही पक्षांनी अजित पवार गट आणि रिपाइं गटाचा विचार अद्याप केलेला नाही.

तर होईल तारेवरची कसरत....१८ प्रभागांमध्ये (७२ वॉर्ड) महायुतीतील शिवसेना (शिंदेसेना) आणि भाजपमध्ये प्रचंड स्पर्धा आहे. उर्वरित ११ प्रभागांमध्ये (म्हणजेच ४४) मुस्लिमबहुल मतदार असल्यामुळे दोन्ही पक्षांकडे ताकदीचे उमेदवार नाहीत. पाच वर्षांपासून निवडणुका झालेल्या नसल्यामुळे सगळ्यांनाच भाग्य आजमावयाचे आहे. त्यामुळे महायुती करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत उमेदवारांची संख्या वाढल्यामुळे कुठेही युती झाली नाही. तोच प्रकार मनपा निवडणुकीत होण्याची शक्यता भाजपच्या एका नेत्याने वर्तविली.

युती झाल्यास काय होणार....भाजप, शिंदेसेनेसह घटक पक्षांची युती झाल्यास भाजप व शिंदेसेनेमधील अनेक इच्छुकांचा बळी जाणार हे निश्चित आहे. पूर्व मतदारसंघात १०, पश्चिम मतदारसंघात आठ व मध्य मतदारसंघात नऊ, तर फुलंब्री मतदारसंघात २ मिळून २९ प्रभाग आहेत. या सर्व प्रभागांमध्ये सेना-भाजपकडे इच्छुकांची मोठी यादी आहे. दोन्ही पक्षांकडे सुमारे २२०० अर्ज आले आहेत. युती झाल्यास वाट्याला येणाऱ्या प्रभागानुसार ज्यांना उमेदवारी मिळणार नाही, ते बंडखोरी करतील, अथवा आघाडीत जातील, अशी भीती सेना-भाजपला आहे.

अजून काही बैठका होतीलमहायुतीमध्ये निवडणुका लढवाव्यात असे मंत्री बावनकुळे यांनी आज सूचना केल्या आहेत. त्यानुसार कोअर कमिटीने प्राथमिक चर्चा केली आहे. अजून काही बैठका होतील, त्यानंतर पुढील निर्णय घेऊ.- शिरीष बोराळकर, कोअर कमिटी सदस्य.

पक्षाची भूमिका महत्वाचीमहायुतीमध्ये निवडणूक लढण्याची पक्षाची भूमिका आहे. कुणीही वादंग हाेईल, असे निर्णय घ्यायचे नाहीत, असे मंत्री बावनकुळे यांनी बुधवारच्या बैठकीत सांगितले.- समीर राजूरकर, निवडणूक प्रमुख

परिस्थिती बदललेली आहे२०१५ चा विषय आता संपलेला आहे. सर्व परिस्थिती बदललेली असून, ‘नया भिडू नया राज’ या पद्धतीने जागा वाटपाचा विचार करावा, त्यानुसार महायुतीचा विचार झाला पाहिजे.- बापू घडमोडे, माजी महापौर.

English
हिंदी सारांश
Web Title : Alliance talks deflate hopes of BJP aspirants in Aurangabad.

Web Summary : Bawankule's push for alliance in Aurangabad deflates BJP aspirants' hopes. Seat sharing based on 2015 formula causes unrest. Factions fear rebellion if denied tickets.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation Electionछत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक २०२६BJPभाजपाShiv Senaशिवसेना