शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

छत्रपती संभाजीनगरात विठ्ठल रुक्मिणीची तब्बल ५६ स्वतंत्र मंदिरे, सर्वात जुने धावणी मोहल्ल्यात

By प्रशांत तेलवाडकर | Updated: July 17, 2024 15:30 IST

याशिवाय अन्य देवदेवतांच्या मंदिरातही विठ्ठल मूर्तीचे स्थान आहे.

छत्रपती संभाजीनगर : आषाढी एकादशी म्हटले की, भाविक सोलापूर जिल्ह्यातील मोठे पंढरपूर असो की, शहराजवळील छोटे पंढरपूर येथील विठ्ठलाच्या दर्शनाला जात असतात. अहो, आपल्या शहरातही एक किंवा दोन नव्हे, तर तब्बल विठ्ठल-रुक्मिणीची तब्बल ५६; तीही स्वतंत्र मंदिरे आहेत. याशिवाय अन्य देवदेवतांच्या मंदिरातही विठ्ठल मूर्तीचे स्थान आहे. ही सर्व मंदिरे शहर व परिसरात आहेत.

सर्वात जुने मंदिर धावणी मोहल्ल्यातविठ्ठल रुक्मिणीचे शहरातील सर्वात जुने मंदिर कोणते, असा प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाला असेल. शहागंज गांधी पुतळा चौकाजवळील धावणी मोहल्ल्यात ३५० वर्षांपूर्वीचे विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आहे. गाभाऱ्यात एक नव्हे, तर विठ्ठल रुक्मिणीच्या दोन मूर्ती आहेत. यातील एक उत्सव मूर्ती आहे. वर्षातून एकदाच आषाढी एकादशीच्या दिवशी उत्सव मूर्तीला मंदिरातून बाहेर नगर प्रदक्षिणेसाठी नेले जाते.

सर्वात नवीन मंदिर सुधाकर नगरातविठ्ठल रुक्मिणीचे सर्वात नवीन मंदिर सातारा परिसरातील सुधाकर नगराच्या अलीकडे डोंगराच्या पायथ्याशी आहे. हिमालयेश्वर महादेव मंदिर परिसरात नवीन मंदिर उभारले आहे. राजस्थानमधील जयपूर येथून ४ फूट उंचीच्या मूर्ती आणल्या आहेत. काळ्या पाषाणातील या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी २०२४ या दिवशी करण्यात आली.

विठ्ठल रुक्मिणीसोबत राई असलेले शहरातील एकमेव मंदिरशहरातील प्रत्येक भागात, गल्लीमध्येही विठ्ठल रुक्मिणीची मंदिरे आहेत. पण, फक्त एक मंदिर असे आहे की, तिथे भगवान विठ्ठल व रुक्मिणीसोबत राईचे पण दर्शन होते. ते मंदिर म्हणजे जयसिंगपुरात राजस्थान सरकार देवस्थान विभागातर्फे बांधलेले एकमेव मंदिर आहे. विठ्ठल रुक्मिणी राईसोबत अन्य देव-देवतांच्या मूर्ती येथे आहेत. विठ्ठलाच्या आरतीत ‘रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा’ असा उल्लेख येतो. त्या राईचे दर्शन येथे होते.- प्रा. अनिल मुंगीकर, मंदिरांचे अभ्यासक.

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशीAurangabadऔरंगाबाद