शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

संपाचा परिणाम, दहावी- बारावीच्या उत्तरपत्रिकांचे गठ्ठे पडून; तरीही निकाल वेळेतच होईल जाहीर

By विजय सरवदे | Updated: March 18, 2023 17:27 IST

विद्यार्थी हितासाठी काही शिक्षक पेपर तपासत आहेत.

छत्रपती संभाजीनगर : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या दहावी-बारावीच्या लेखी परीक्षा सध्या सुरु आहेत. परंतु, जुन्या पेन्शन योजनेसाठी सुरू असलेल्या संपामुळे शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासण्यास नकार दिला आहे. त्यामुळे कस्टोडियनकडून आलेले उत्तरपत्रिकांचे गठ्ठे शाळा- महाविद्यालयात पडून आहेत.

बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू झाली. तेव्हापासून सुमारे दहा दिवस कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेने बारावीच्या परीक्षा कामकाजावर बहिष्कार टाकला होता. त्यानंतर या संघटनेच्या काही मागण्या मान्य झाल्यामुळे परीक्षेच्या कामकाजावरील बहिष्कार मागे घेतला. त्यानंतर १४ मार्चपासून जुनी पेन्शन योजना संदर्भात राज्यव्यापी संप सुरू झाला. या संपात कनिष्ठ महाविद्यालयीन संघटना सहभागी झाली. विद्यार्थी हितासाठी परीक्षेचे काम करणार ; परंतु उत्तरपत्रिका तपासणार नसल्याची भूमिका या संघटनेने घेतली. त्यामुळे मागील चार दिवसांपासून पुन्हा उत्तरपत्रिका तपासणीचे काम खोळंबले आहे. तशीच गत दहावी परीक्षेची देखील झाली आहे. माध्यमिक शिक्षकांचाही संपात सहभाग असल्यामुळे काही शिक्षक पेपर तपासतात, तर काही शिक्षकांनी पेपर तपासणीचे काम थांबविले आहे.

कशी असते पेपर तपासणीची प्रक्रियादहावी- बारावीच्या परीक्षेत पेपर संपल्यानंतर केंद्र संचालक उत्तरपत्रिकांचे गठ्ठे कस्टोडियनकडे जमा करतात. बोर्डाने दहा- ते पंधरा परीक्षा केंद्रासाठी एक कस्टोडियन नेमलेला असतो. कस्टोडियनकडून यादीतील शाळा- महाविद्यालयांच्या पत्त्यावर तपासणीसाठी उत्तरपत्रिका टपालाने पाठविल्या जातात. मुख्याध्यापक किंवा प्राचार्य संबंधित विषयाच्या शिक्षकांकडे उत्तरपत्रिका तपासणीसाठी देतात. तपासल्यानंतर सदरील उत्तरपत्रिका बोर्ड मार्फत जमा केल्या जातात.

बोर्ड काय म्हणतेयासंदर्भात बोर्डाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, संपामुळे उत्तरपत्रिका तपासणीच्या कामावर थोडाफार परिणाम झाला आहे. तरीही विद्यार्थी हितासाठी काही शिक्षक पेपर तपासत आहेत. तरीही शाळा- महाविद्यालयांत किती गठ्ठे पडून आहेत, याची माहिती २५ मार्चपासून समजेल. त्या दिवसापासून दहावी आणि बारावीच्या तपासलेल्या उत्तरपत्रिका जमा करण्यास सुरूवात केली जाणार आहे. काहीही झाले तरी निकाल वेळेतच जाहीर होईल.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादexamपरीक्षा