शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
2
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
4
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
5
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
6
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
7
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
9
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
10
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
11
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
12
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
13
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
14
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
15
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
16
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
17
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
18
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
19
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
20
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...

स्फोटक शोधण्यात तरबेज श्वान आर्याचे निधन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कारावेळी हॅण्डलर्सला अश्रू अनावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 19:48 IST

२०१२ साली आर्या पोलीस दलात दाखल झाली. पुण्यात ६ महिने प्रशिक्षण घेऊन औरंगाबाद बीडीडीएसमध्ये ती दाखल झाली.

ठळक मुद्देसहायक आयुक्तांनी वाहिले पुष्पचक्र हवेत झाडल्या बंदुकीच्या फैरी

औरंगाबाद : राष्ट्रपती, पंतप्रधानांसह अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या आगमनापूर्वी त्यांच्या सभास्थळासह दौऱ्यात सुरक्षेची काळजी घेणाऱ्या बॉम्बशोधक व नाशक पथकाचा एक सदस्य श्वान आर्याचे गुरुवारी पहाटे निधन झाले. सहायक पोलीस आयुक्तांनी आर्याच्या पार्थिवास पुष्पचक्र वाहिले. त्यानंतर बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून शासकीय इतमामात आर्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तेव्हा छावणी स्मशानभूमीत उपस्थित पोलिसांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या.

‘कुत्र्या, मांजराचं जीणं नशिबी येऊ नये,’ असा संवाद आपल्या कानावर पदोपदी पडत असतो. परंतु कोणताही जीव जन्माने नव्हे, तर कर्माने महान होतो, हे पोलीस दलातील बॉम्बशोधक व नाशक पथकातील श्वान आर्याच्या निधनाच्या निमित्ताने पुन्हा दिसले. १२ वर्षीय श्वान आर्याने गर्भपिशवीच्या आजारामुळे बुधवारी अंतिम श्वास घेतला. २०१२ साली आर्या पोलीस दलात दाखल झाली. पुण्यात ६ महिने प्रशिक्षण घेऊन औरंगाबाद बीडीडीएसमध्ये ती दाखल झाली. शहरातील विमानतळ, औरंगाबाद खंडपीठ, जिल्हा न्यायालय, रेल्वेस्थानक, बसस्थानक, विभागीय आयुक्तालय आदी महत्त्वाच्या ठिकाणांची स्फोटक तपासणी आर्या आपल्या सहकाऱ्यासह करीत होती. यासोबत महाराष्ट्रातील विविध शहरांसह आणि गोवा राज्यात व्ही.व्ही.आय.पीं.च्या दौऱ्यात सहभागी होऊन आर्याने महत्त्वाची कामगिरी बजावली होती.

सहा महिन्यांपासून आर्या गर्भाशयाच्या आजाराने त्रस्त होती. तिच्यावर शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. शिवाय तिला सांधेदुखीचा त्रास होता. यातच गुरुवारी सकाळी ६:३० वाजता आर्याची प्राणज्योत मालवली. यानंतर आर्याचे शवविच्छेदन करण्यात आले. सजविलेल्या वाहनातून तिची अंत्ययात्रा काढून छावणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी सहायक पोलीस आयुक्त विश्वंबर गोल्डे, पोलीस निरीक्षक सुशील जुमडे यांनी आर्याच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. पोलीस दलाने सलामी देत बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडल्या. पोलीस उपनिरीक्षक बनसोडे यांच्यासह बीडीडीएसचे अन्य कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

हॅण्डलर्सला अश्रू अनावरगेल्या पाच वर्षांपासून पोलीस हवालदार कृष्णा काळे आणि हवालदार कचरू कापसे आर्याचे हॅण्डलर म्हणून काम पाहत होते. आर्याच्या अंत्यसंस्कारप्रसंगी त्यांना अश्रू अनावर झाले. यामुळे वातावरण गंभीर बनले होते. श्वान आर्या स्फोटक शोधण्यात अत्यंत तरबेज आणि आज्ञाधारक होती, असे पोलीस निरीक्षक जुमडे यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliceपोलिसdogकुत्रा