शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

कृत्रिम पावसाचा मराठवाड्यात प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 04:06 IST

पाण्याची, पिकांची तरी चिंता मिटावी; पहिल्याच दिवशी कमी ढग व फ्रिक्वेन्सीचा अडसर

औरंगाबाद : पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले असताना जायकवाडी धरणाचा अपवाद सोडला, तर मराठवाड्यातील धरणं अजूनही मृतसाठ्यातच आहेत. या संकटातून बाहेर पडण्यासाठी शुक्रवारी दुपारी एक वाजता चिकलठाणा विमानतळावरून ख्याती वेदर मॉडिफिकेशनच्या विमानाने उड्डाण घेतले खरे. मात्र, विरळ ढग आणि फ्रिक्वेन्सी न जुळल्याने कृत्रिम पाऊस न पाडताच अवघ्या ४५ मिनिटांत विमान खाली उतरले.दुष्काळग्रस्त भागात ५२ दिवस कृत्रिम पावसाचे प्रयोग होणार आहेत. हिंगोली जिल्ह्यात ४0 टक्क्यांपर्यंत पर्जन्यमान झाले आहे, तर बीड, लातूर आणि उस्मानाबाद हे जिल्हे अजूनही कोरडेच आहेत. ऐन पावसाळ्यात जवळपास ७९५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, सर्व १४४ प्रकल्पांपैकी १०३ कोरडेठाक आहेत. जालना जिल्ह्यात सरासरीच्या २५० मिलिमीटर (३५ टक्के) एवढा कमी पाऊस झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात ४२.६९ टक्के पावसाची नोंद झाली आहे. मात्र, नाशिक नगरमधून पाणी सोडल्याने जायकवाडी धरणात ७३ टक्के जलसाठा झाला आहे.कृत्रिम पावसाचा पहिला दिवसविमानाला दोन्ही बाजूंनी ४८ सोडिअम अ‍ॅण्ड सिल्व्हर आयोडाईडचे ‘एरोसोल्स’ बसविले. दुपारी एक वाजता शास्त्रज्ञांसह विमानाने औरंगाबाद पश्चिमेला उड्डाण भरले. ढगांची गर्दी नसल्याने आणि फ्रिक्वेन्सी न जुळल्याने दोन वाजेच्या सुमारास विमान खाली उतरले.असा पडतो कृत्रिम पाऊस ‘सी बॅण्ड डॉप्लर’ रडार व पावसासाठी वापरण्यात येणारे सोडिअम अ‍ॅण्ड सिल्व्हर आयोडाईडचे ‘एरोसोल्स’, ढगांची गर्दी तपासून त्या दिशने ‘एरोसोल्स’(नळकांड्या) सोडण्यात येतात. ‘सी बॅण्ड डॉप्लर’ या रडारच्या साहाय्याने ढगांचे स्कॅनिंग केले जाते. त्या स्कॅनिंग इमेजमध्ये (फोटो) किती पाणी आहे, पडण्याची क्षमता कशी आहे, किती किलोमीटरच्या रेंजमध्ये ते पाणी पडेल, याचा अंदाज लावण्यात येतो. त्यानुसार विमानाच्या साहाय्याने नळकांड्या ढगात सोडण्यात येतात आणि ते ढग दाटून येऊन त्या भागात पावसाच्या सरी होऊन बरसतात. जगभरामध्ये तीन ते चार देशांमध्ये या महागड्या तंत्राने पाऊस पाडण्याचा प्रयोग केला जातो.मंत्र्यांना दिसले विदर्भात ढगमराठवाड्यात ‘ट्रायल रन’च्या अनुषंगाने विमानाचे शुक्रवारी उड्डाण होत नाही, तोवरच मंत्रालयातून एका मंत्र्याने विमानतळावर एका शास्त्रज्ञाला फोनवरून विदर्भात ढग असून, तिकडे उड्डाण करण्याच्या सूचना केल्या! सी-डॉप्लर रडार अजून कार्यान्वित झालेले नाही, अक्षांश, रेखांश सेटिंग होत नाही, तोवरच विदर्भाकडे प्रयोग करण्याच्या सूचना आल्याने शास्त्रज्ञही गांगरून गेले.