शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

‘कृत्रिम मानवी बाॅडी’ सांगते उपचार चूक की बरोबर! भावी डाॅक्टरांना सराव झाला सोपा

By संतोष हिरेमठ | Updated: April 25, 2024 17:07 IST

थेट रुग्णांवर प्रयोग टाळण्यास मदत, खरा देह उपलब्धतेलाही पर्याय, घाटी रुग्णालयातील ‘स्किल लॅब’मध्ये २० ‘कृत्रिम बाॅडी’

छत्रपती संभाजीनगर : वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रुग्णांवर उपचाराचा सराव आणि अभ्यासासाठी मानवी देह महत्त्वाचे ठरतात. मात्र, देहदानाचे प्रमाण कमी असल्याने अनेक विद्यार्थ्यांमध्ये एखादा देह मिळतो. यावरच मात करण्यासाठी घाटीतील शरीररचनाशास्त्र विभागात ‘स्किल लॅब’ साकारण्यात आली आहे. याठिकाणी २० ‘कृत्रिम मानवी बाॅडी’ असून, याद्वारे सलाइन देणे, टाके टाकणे, ‘बीपी’ तपासणे यासह प्रसूतीचाही सराव करता येतो. इतकेच नाही तर भावी डाॅक्टरांनी सरावात काही चूकही केली तर ते लक्षात आणून दिले जाते.

मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या मानांकनानुसार आठ विद्यार्थ्यांमागे एक मानवी शरीर अभ्यासासाठी मिळावे, असा संकेत आहे. प्रत्यक्षात मात्र २० ते २५ विद्यार्थ्यांमागे एक देह देण्याची वेळ अनेकदा ओढवते. कारण देहदानाचे प्रमाण कमी आहे. घाटीत २०२३-२४ या वर्षासाठी ८ देह उपलब्ध होते; तर विद्यार्थिसंख्या २०० आहे. जानेवारीत तर केवळ तीन देहच होते. रुग्णालय प्रशासनाने विविध माध्यमांतून प्रयत्न केले आणि देहदान वाढले. सध्या येथे १४ देह आहेत. कधी देहदान होते, तर कधी नाही. यावर काही प्रमाणात का होईना पर्याय शोधण्यासाठी घाटीत अत्याधुनिक अशी ‘स्किल लॅब’ साकारण्यात आली आहे. याठिकाणी अत्याधुनिक यंत्रणेसह कृत्रिम देह उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

कृत्रिम बाळाचाही जन्मप्रसूतीचा सराव करताना कृत्रिम बाळाचाही जन्म होतो. त्याबरोबर हृदय कसे असते, इंजेक्शन, सलाइन कशा पद्धतीने द्यावे, याचाही सराव कृत्रिम देहावर करता येतो. कृत्रिम देह सरावासाठी महत्त्वपूर्ण ठरतील. त्यासोबत खऱ्या मानवी देहांचीही गरज कायम राहणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना फायदाशरीररचनाशास्त्र विभागात अत्याधुनिक अशी स्किल लॅब साकारण्यात आली आहे. याठिकाणी अनेक सोयीसुविधा देण्यात आल्या असून, या स्किल लॅबचा वैद्यकीय विद्यार्थ्यांना फायदा होईल.- डाॅ. शिवाजी सुक्रे, अधिष्ठाता

सराव करणे सोपेस्किल लॅबमध्ये सध्या २० रबराचे कृत्रिम शरीर (मॅनेक्विन) आहेत. त्यांच्या मदतीने खऱ्या रुग्णांवर होणाऱ्या शल्यक्रिया, विविध तपासण्या, प्रसूती आदींचा सराव शिकाऊ डाॅक्टरांना करता येतो. थेट रुग्णांवर प्रयोग करण्याऐवजी स्किल लॅबमध्ये सराव, संशोधन करून वैद्यकीय शिक्षण घेणे शक्य झाले आहे.- डाॅ. अर्चना कल्याणकर, प्राध्यापक व विभागप्रमुख, शरीररचनाशास्त्र विभाग, घाटी

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटी