लासूर स्टेशन : गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन बाजार समितीमध्ये नवीन तुरीची आवक सुरू झाली आहे. मात्र, अपेक्षित भाव मिळत असला तरी तुरीचे उत्पन्न घटल्याने भाव असूनही माल नाही, अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे.
लासूर स्टेशन येथील कृषी उत्पन्न बाजार समिती औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्वात मोठी बाजार समिती आहे. येथे औरंगाबाद जिल्ह्यातील विविध भागांतून शेतकरी शेतीमाल विक्रीसाठी आणतात. यंदा समाधानकारक पाऊस होता. मात्र, वारंवार वातावरणात बदल झाल्याने तुरीवर रोगांचा प्रादुर्भाव झाला. यासाठी शेतकऱ्यांनी महागडे कीटकनाशके फवारुनही फायदा झाला नाही. याचा उत्पन्नावर विपरित परिणाम झालेला आहे. व्यापारी शेतकऱ्यांकडून किरकोळ तुरी खरेदी करून ठोक विक्री करीत आहेत. सध्या बाजारात तुरीची डाळीला शंभर रुपये मोजावे लागत आहे. मात्र, तुरीच्या डाळीला एक किलो डाळी शंभर रुपये मोजावे लागत आहे. लासूर स्टेशन येथील बाजारात तुरीला
तूर गोणी जास्ती भाव कमी भाव सरासरी भाव
पांढरी तूर ११०० ७००० ५५०० ६३००
काळी तूर ७० ६१०० ५२०० ५७००
लाल तूर ५० ६४०० ५३०० ६१००