शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
2
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
3
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
4
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
5
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
6
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
7
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
8
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
9
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
10
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
11
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
12
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
13
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
14
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
15
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
16
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
17
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
18
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
19
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
20
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
Daily Top 2Weekly Top 5

फ्लेमिंगोसह पाहुण्या पक्ष्यांचे जायकवाडी धरणावर आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 13:51 IST

लोभस रुप असणाऱ्या फ्लेमिंगोसह इतर पाहुण्या पक्ष्यांचे जायकवाडी धरणावर आगमन झाले असून पर्यटकांना ते भुरळ घालत आहेत.

ठळक मुद्देपर्यटकांना भुरळ यंदा महिनाभर उशिराने आगमन 

पैठण (औरंगाबाद ) :  रुबाबदारपणा, लाल बुंद चोच, लांबसडक मान, उंच असणारे पाय असे लोभस रुप असणाऱ्या फ्लेमिंगोसह इतर पाहुण्या पक्ष्यांचे जायकवाडी धरणावर आगमन झाले असून पर्यटकांना ते भुरळ घालत आहेत. यातील फ्लेमिंगो पक्षी धरणाचे आकर्षण ठरत आहे. यंदा दुष्काळामुळे महिनाभर उशिराने या पाहुण्यांचे आगमन झाले आहे.

पैठण येथील नाथसागर जलाशयाच्या आकर्षणात भर घालणारे तसेच ज्यांची पर्यटकांसह पक्षीप्रेमींना आतुरता असते अशा देश-विदेशी पक्ष्यांचे थवेचे थवे हजारो कि.मी.चे अंतर पार करीत येथे येण्यास सुरूवात झाली आहे.  मोबाईल व कॅमेऱ्यात हे विहंगम दृश्य टिपण्यासाठी पक्षीप्रेमी व पर्यटकांची पाऊले नाथसागराकडे वळू लागली आहेत. नाथसागराच्या किनाऱ्यावर रोज सकाळी व संध्याकाळी पक्ष्यांच्या हालचाली, सुरेल आवाजाच्या प्रभावाने या परिसरातील प्रसन्नतेमध्ये भर पडत आहे. निसर्गाची किमया व पक्ष्यांची दुनिया जवळून अनुभवयाची असल्यास नाथसागरासारखे दुसरे ठिकाण मराठवाड्यात तरी नाही. निरव शांतता पसरलेल्या तसेच धरणाच्या कडेला आणि मानवी हस्तक्षेप नसणाऱ्या शांत परिसरात किडे, मासे आदी खाद्यावर हे पक्षी आपली गुजरान करीत असतात. 

निसर्गाचा बेत घेत धरणाकडे आगेकूचयंदा पाऊस कमी पडल्याने दुष्काळस्थिती निर्माण झाली. त्यामुळे हिवाळा लांबला गेला. परिणामी थंडी उशिरा पडण्यास सुरूवात झाली. डिसेंबर महिना उजाडताच थंडी पडायला सुरूवात झाली. त्यामुळे निसर्गाचा बेत घेत हे देशी-विदेशी पक्षी जायकवाडी धरणाकडे महिनाभर उशिरा का होईना आगेकूच करत आहेत. यावर्षी दुष्काळामुळे नाथसागर वगळता मराठवाड्यातील छोट्या मोठ्या धरणांसह तलावांचे पाणी आटून गेले आहे.  देशी -विदेशी पक्ष्यांना पसंतीचे सोयीस्कर ठिकाण नाथसागर वाटत असल्याने त्यांनी आपला मोर्चा जायकवाडीकडे वळविला आहे. 

देश-विदेशातील पक्षीयुरोप, फ्रान्स, रशिया, इंग्लंड, भूतान, लडाख, बलुचिस्तान, दक्षिण आफ्रिकेसह अनेक देशांमधून येथे पक्ष्यांचे आगमन होत असते. स्पून बिल, व्हाइट आयबीज, ग्लासी आयबीज, पोचार्ड, स्पॉट बिल, गोल्डन डक,  कुट, गल, बार हेडेड, गुज, किंगफिशर, पाइड किंगफिशर, स्मॉल ब्ल्यू, व्हाइट थ्रोट, कमळसह फ्लेमिंगो पक्ष्यांची नाथसागरावर शाळा भरत आहे.  

विणीच्या हंगामासाठी विदेशी पक्ष्यांचे नाथसागराला पसंती :-परदेशात या दिवशी हिमवृष्टीस सुरूवात होते. त्यामुळे अंडी घालणाऱ्या मादींना ठिकाण बदलावे लागते. त्यादृष्टीने विदेशी पक्षी भारतातील इतर धरणासह नाथसागरावर येतात. येथे विणी घालून उन्हाळ्यात म्हणजे मार्चच्या प्रारंभी हे विदेशी पक्षी परतीच्या प्रवासाला निघतात.

विलोभनीय कसरत, आकाशात फेरफटकापैठणसारख्या पर्यटक व धार्मिक देवस्थान असलेल्या शहरात पाणकावळ्या, भोरड्या या पक्ष्यांचेही वास्तव्य आहे. दररोज सूर्यास्तावेळी आकाशात त्यांच्या हवाई कसरती सुरू असतात. हे विलोभनीय दृश्य पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फेडत आहे. आकाशात कधी उंच तर कधी खाली गिरक्या घालतानाचा नजारा पर्यटकांना दिवाना करत आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणtourismपर्यटनAurangabadऔरंगाबाद