==================
उसने पैसे परत मागितल्याने मारहाण
औरंगाबाद : उसने घेतलेले पैसे परत मागण्यासाठी आलेल्या राहुल अरुण अग्रवाल (वय ३०, रा. कैलासनगर ) यांना आरोपी सागर देवकाते (रा. कैलासनगर ) याने दगडाने मारून जखमी केले. याप्रकरणी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
===========
वीजचोरी प्रकरणी गुन्हा
औरंगाबाद : वीजचोरी करणाऱ्या तीन ग्राहकांविरुद्ध महावितरण कंपनीच्या भरारी पथकाने कारवाई केली.
अमृतसाई प्लाझा येथील जगदीश दीपक हातागळे यांना वीजचोरी करताना पकडण्यात आले. तसेच अंकुशनगर, जोगेश्वरी येथील रमेश भास्कर देशमुख यांनी १ हजार २५१ युनिट वीजचोरी केल्याचे समोर आले. एका महिलेवर अडीच हजार युनिट वीजचोरी केल्याचा गुन्हा भरारी पथकाचे सहाय्यक अभियंता योगेश खोमणे यांनी छावणी पोलीस ठाण्यात दाखल केला.
======