शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

महिला, मुलींची छेड काढणा-या उपद्रवी भावांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 6:38 PM

सिडको एन-६ मधील मथुरानगरात राहणा-या एका गल्लीतील महिला आणि मुलींची सारखी छेड काढून त्यांचे जगणे मुश्कील करणा-या दोन भावांना सिडको पोलिसांनी रविवारी सकाळी अटक केली.

औरंगाबाद, दि. २४ : सिडको एन-६ मधील मथुरानगरात राहणा-या एका गल्लीतील महिला आणि मुलींची सारखी छेड काढून त्यांचे जगणे मुश्कील करणा-या दोन भावांना सिडको पोलिसांनी रविवारी सकाळी अटक केली. विशेष म्हणजे २३ सप्टेंबर रोजीच यातील एकजण छेडछाडीच्या गुन्ह्यातून जामीनवर सुटला होता. लॉकमधून बाहेर आल्यानंतर त्याने गल्लीत दहशत निर्माण करून घराच्या खिडकीच्या काचा फोडणे, दुचाकी फोड करून तक्रारदारांना मारहाण केली.

बाळू उर्फ देवेंद्र उर्फ गणेश पैठणे आणि सतीश पैठणे अशी आरोपींची नावे आहेत.याविषयी रहिवाशांनी सांगितले की, आरोपी आणि तक्रारदार महिला आणि नागरीक सिडको एन-६मधील मथुरानगरात राहतात. ही भावंडे कामधंदा काहीच करीत नाहीत. ते सतत गल्लीतील महिला आणि मुलींची टिंगलउडवतात. त्यांची छेड काढतात. २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी घरासमोरील एका महिलेची बाळूने छेड काढली. यावेळी पीडितेचा पती आणि शेजा-यांनी त्यास जाब विचारला असता बाळूसह सतीशने त्यांना शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. या गुन्ह्यात पोलिसांनी बाळूला अटक केली आणि २३ रोजी सोडून दिले. त्यानंतर रात्री उशीरा तो दुचाकीने सुसाट गल्लीत आला आणि त्याने आणि सतीशने दहशत निर्माण करीत तक्रारदार महिलेच्या घराच्या खिडकीची काच फोडली.दोन दिवसापूर्वी पोलिसांना साक्ष देणा-या  नागरीकांना शिवीगाळ करीत त्यांची दुचाकी त्याने लोटून देत आडव्या पाडल्या. यावेळी सतीशनेही त्यांना धमकावले. या घटनेनंतर नागरीकांनी सिडको पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्याच्याविरूद्ध तक्रार अर्ज दाखल केला. तेव्हा अदखलपात्र गुन्हा नोंदवितो,असे सांगून पोलिसांनी रात्री त्याला ताब्यात घेतले. यानंतर आज सकाळी त्याला घरी नेऊन सोडले. दहशत माजविणा-यास पोलिसांनी घरी आणून सोडल्याचे पाहून रहिवाशी संतप्त झाले. 

ठाण्यासमोर ठिय्यामथुरानगरातील २० ते २५ महिला आणि पुरूषांनी सिडको ठाणे गाठून आरोपी सतीश आणि बाळू यांच्यामुळे आमचे जगणे मुश्कील झाले आहे. त्यांनी रात्रीच आम्हाला मारहाण केली आणि तुम्ही त्याला कसे सोडले असा जाब नागरीकांनी पोलिसांना विचारला. यावेळी पोलीस निरीक्षक कैलास प्रजापती यांनी सर्वांची समजूत काढून फिर्याद द्या,  आरोपीविरूद्ध कठोर कारवाई करतो, असे आश्वासित केले आणि तातडीने दोन्ही आरोपी भावांना त्यांनी ताब्यात घेतले. अल्पवयीन मुलींची छेड काढल्याचा आणि तोडफोड,मारहाणीचा गुन्हा नोंदविण्यात आला.